शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

168 हेक्टर सामुहिक वनहक्क क्षेत्रात पावणेदोन लाख वृक्षांचे होणार रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक वनहक्क क्षेत्रावर पावणे दोन उपयुक्त रोपांची लागवड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक वनहक्क क्षेत्रावर पावणे दोन उपयुक्त रोपांची लागवड करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून गती देण्यात आलेल्या या कामासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने वनहक्क जमिनी हरित होण्यास मदत मिळणार आह़े जिल्हा प्रशासन, ग्रामीण वन नियोजन समिती व लोकसमन्वयक प्रतिष्ठान यांच्यावतीने जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येत आह़े एक हेक्टर क्षेत्रात 1 हजार 111 याप्रमाणे सामाजिक वनीकरण विभाग 104 हेक्टरवर 1 लाख 15 हजार 544 तर वन विभाग 64 हेक्टर क्षेत्रात 62 हजार 216 रोपांची लागवड करणार आह़े यांतर्गत सामूहिक वनीकरण   विभाग नंदुरबार तालुक्यातील वाघाळे, अंबापुर, सुतारे, अजेपुर, अक्कलकुवा तालुक्यात सरी, दहेल, वालंबा, रोजकुंड, भराडीपादर, खाई, गुलीआंबा, भगदरी, कुंडी या 13 गावात 104 हेक्टरवर 1 लाख 15 हजार 544 वृक्षांची लागवड होणार आहे. शहादा वनविभाग बुरुमपाडा, तोरणमाळ, सिंधी, लेगापाणी, निगदी, कुंभरी या गावांमध्ये प्रत्येकी आठ हेक्टरप्रमाणे 48 हेक्टर क्षेत्रावर 53 हजार 328 तसेच मेवासी वनविभाग तळोदा यांच्याकडून अमोणी आणि मालदा या गावातील 16 हेक्टर क्षेत्रावर 17 हजार 776 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. लागवड होणारी ही झाडे आंबा, जांभुळ, चिंच, बोर, आवळा, सिताफळ, बेल, शेवगा, कवठ, खैर, बांबू, कडुनिंब, पेरु, आवळा ,वड, बेहडा यांची आहेत़ यामुळे त्यांच्यातून आदिवासी बांधवांना लाभच होणार आह़े सामूहिक वनहक्क क्षेत्रात लागवड होणा:या या झाडांसाठी रोहयोंतर्गत खड्डे खोदले गेल्याने त्या-त्या गावातील आदिवासींना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती आह़े तब्बल 30 गावांनी या उपक्रमात सक्रीय सहभागी होत गाव हरित करण्याचा संकल्प केला आह़े वनविभाग, वनीकरण विभाग आणि लोकसमन्वयचे पदाधिकारी उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत़