शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

वेगवेगळ्या घटनेत आठ विवाहितांचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वेगवेगळ्या घटनेत जिल्ह्यातील आठ विवाहितांचा छळ केल्याची घटना घडली. गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वेगवेगळ्या घटनेत जिल्ह्यातील आठ विवाहितांचा छळ केल्याची घटना घडली. गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मजुरीला जात नाहीधडगाव तालुक्यातील बिजरीचा वियारावड येथील सुनिता भिमसिंग वळवी या विवाहितेचा गावातीलच सासरी घरातील काम येत नाही, मजुरीला जात नाही म्हणून सासरच्या लोकांनी छळ केला. छळाला कंटाळून सुनिताबाई यांनी फिर्याद दिल्योन भमसिंग डोंगा वळवी, डोंगा माद्या वळवी, रानुबाई डोंगा वळवी, रा.बिजरीचा वियारावड यांच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात झाला छळदुसरी घटना गोरखपूर येथे घडली. नंदुरबारातील पटेलवाडी भागातील विवाहिता सैय्यद नुरसबा यांचा विवाह सैय्यद मोहम्मद अब्दुल आलम यांच्याशी झाला होता. सासरची मंडळी चारित्र्याच्या संशयावरून त्यांना त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून महिलेने फिर्याद दिल्याने सैय्यद अब्दूल आलम, नफिसा खातून आलम यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पैशांसाठी मारहाणतिसरी घटना ठाणेपाडा, ता.नंदुरबार येथील विवाहितेबाबत घडली. मनिषा संतोष सुर्ववंशी या विवाहितेचा सासरी गुलतारे, ता.साक्री येथे माहेरून पैसे आणण्यासाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून मनिषा यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संतोष रामदास सूर्यवंशी, रामचंद्र जानू सूर्यवंशी, रत्नाबाई रामचंद्र सूर्यवंशी, बेडकीखडी, अनिता कोकणी, भिल्या कोकणी, रा.गुलतारे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांवर गुन्हाचौथी घटना भागापूर, ता.शहादा येथे घडली. पूजा पंकज पाटील, रा.पुरुषोत्तमनगर यांचा सासरी भागापूर येथे छळ केला जात होता. त्याला कंटाळून त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पंकज मधुकर पाटील, रा.वापी, मधुकर उद्धव पाटील, लिलाबाई मधुकर पाटील, नंदकिशोर मधुकर पाटील, रा.लोणखेडा, कविता संजय पाटील, संजय श्रीपत पाटील व निशा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलबाळ होणार नाही म्हणून त्रासपाचवी घटना सोनगीर येथे घडली. अपंग मुलगी झाली, त्याचवेळी गर्भपिशवी काढण्यात आली, त्यामुळे आता मुलबाळ होणार नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याने कोंढावळ, ता.शहादा येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेखा विलास बागुल या विवाहितेचा छळ करण्यात येत होता. त्याला कंटाळून त्यांनी फिर्याद दिल्याने विलास हिराजी बागुल, हिराजी गबा बागुल, निर्मला हिराजी बागुल, रा.कोंढावळ, ता.शहादा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नोकरीवाली सून पाहिजेसहावी घटना खळीबर्डी, ता.नवापूर येथे घडली. नोकरीवाली सून पाहिजे होती, दिसायला सुंदर नाही तसेच पतीच्या विवाहबाह्य संबधाविषयी जाब विचारल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. दीपिका उत्कर्ष गावीत यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून उत्कर्ष हरिष गावीत, दिनाबाई हरीष गावीत, हरीष बापू गावीत रा. खळीबर्डी यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० लाख रुपये आणावेसातवी घटना नंदुरबारच्या विवाहितेविषयी घडली. प्रिंकल निलेश गायकवाड, रा.सरगम कॅालनी, नंदुरबार  यांचा यावल, जि.जळगाव येथे सासरी छळ झाला. पतीच्या नोकरीसाठी माहेरून २० लाख रुपये आणावे यासाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून प्रिंकल गायकवाड यांनी फिर्याद दिल्याने निलेश राजेंद्र गायकवाड, राजेंद्र चिंतामण गायकवाड, शैलाबाई गायकवाड, वैशाली प्रशांत जाधव, सर्व रा.गणपतीनगर, यावल यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाक देण्याची धमकीआठवी घटना यावल, जि.जळगाव येथेच घडली. नंदुरबारातील कसाई मोहल्ला भागात राहणारी फौजियानाज मोहसीन खान या महिलेचा माहेरून दहा लाख रुपये आणावे यासाठी छळ करण्यात येत होता. तलाक देण्याची धमकी दिली जात होती. त्या छळाला कंटाळून फौजियाखान यांनी फिर्याद दिल्याने मोहसीन खान आबीदखान, जरीना आबीदखान, आसिफखान आबीदखान, मोहसीनाबी आबीदखान, जावेदखान आबीदखान, रुबीनाबी जावेदखान सर्व रा.डांगपूरा कुरेशी मोहल्ला, यावल यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.