शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शिक्षण विस्तार अधिकारी यांना उपशिक्षणाधिकारीपदी पदोन्नती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शिक्षण विस्तार अधिकारी यांना उपशिक्षणाधिकारीपदी पदोन्नती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण वि‍स्तार अधिकारी संघटनेने उपशिक्षणाधिकारी पदोन्नितीसाठी ग्रामविकासमंत्री  हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.राज्यामध्ये उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे आ‍धीच मोठ्या प्रमाणावर रिक्त असून बहुताश जिल्ह्यात १०० टक्के  गट ब पदांवर शिक्षण विस्तार    अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. आधीच्या शासनाने उपशिक्षणाधिकारी पदाच्या सेवा प्रवेश नियमात बदल करून बी.एड. ही शैक्षणिक अर्हता व अध्यापनाचा अनुभव ही अट वगळण्यात आली. राज्यसेवा परिक्षेतून केवल पदवीधारक उमेदवार उपशिक्षणाधिकारी या पदावर रूजू होण्यापेक्षा सहायक गटविकास अधिकारी या समकक्ष पदाला प्राधान्य देताना दिसतात. या कारणाने देखील उपशिक्षणाधिकारी पदे भरली जात नसल्याचे दिसते.आज मितीस ६३ टक्के ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी हे उपशिक्षणाधिकारी पदांवर प्रभारी कार्यरत आहेत. शालेय पोषण आहार अधीक्षक गट ब या पदावर देखील शिक्षण विस्तार अधिकारी प्रभारी कार्यरत आहेत.इ.१० वी, १२वी बोर्ड परिक्षेचे कस्टोडीअन व इतर तत्सम गट ब च्या कार्यसूचीतील कामासाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचीच नियुक्ती केली जात आहे. असे असूनही पदोन्नोतीच्या किचकट अन्यायकारक नियमामूळे ३० वर्षात एकदाही पदोन्नोतीची संधी विस्तार आधिकाऱ्यांना मिळत नसल्याने यासंवर्गात  मोठा असंतोष निर्माण झाला आहे.  शिक्षण विस्तार अधिकारी हे उच्च शैक्षणिक आर्हता धारक व शैक्षणिक अनुभव असलेले जिल्हा तांत्रिक सेवेतील सर्वोच्च पद आहे. त्यांना शैक्षणिक प्रशासन व पर्यवेक्षक  यांचा अनूभव असतो. राज्यात यापूर्वी सन १९८४ साली शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-१ यांना उपशिक्षणाधिकारी गट ब पदावर समायोजित करून सदरचे पद कायमस्वरूपी रदद, करण्यात आले होते. त्या धरर्तीवर सध्या कार्यरत असलेल्या श्रेणी २ शिक्षण विस्तार अधिका-यांना गट ब पदावर समायोजित करून शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे नियमानुसार भरली जातील तसेच  वेतनश्रेणीमध्ये फारसा फरक पडणार नसल्याने शासनावर आर्थिक बोजाही पडणार नाही. त्यामूळे शासनाने या गोष्टीचा गांभिर्याने विचार करावा अशी मागणी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे राज्य सरचिटणिस राजेंद्र आंधळे यांनी केली आहे.