शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कोंढावळ येथेही आढळला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील ३० वर्षीय महिलेला धुळे येथे खाजगी रुग्णालयात कमरेवरील शस्त्रक्रियेसाठी दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील ३० वर्षीय महिलेला धुळे येथे खाजगी रुग्णालयात कमरेवरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचे स्वॅब घेऊन जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून औषधोपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे समजते.कोंढावळ, ता.शहादा येथील ३० वर्षीय महिलेला कमरेचा त्रास होत असल्याने तिला धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५ आॅगस्ट रोजी या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्याआधी स्वॅब घेण्यात येऊन धुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात अहवाल पॉझिटीव्ह आल्याने या महिलेला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार घ्यावा, असे सांगण्यात आल्याचे समजते. त्यानंतर धुळे येथून खाजगी वाहनाने ही महिला व तिचा पती हे रात्री उशिरा कोंढावळ येथे आले. त्यांनी स्वत:हून गावाबाहेरील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतावरच होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला. पोलीस पाटील सुरेशगिरी गोसावी यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ वडाळी येथील आरोग्य केंद्रात कळवले. वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुगड, उपकेंद्र आरोग्य सेविका इंगळे आदींनी शेतावर जाऊन दोन्ही पती-पत्नीची तपासणी करून शहादा येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले.सारंगखेड्यात पुन्हा एक रुग्णसारंगखेडा येथे गेल्या आठवड्यात खाजगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दाम्पत्यास इंदूर (मध्य प्रदेश) येथे कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील १२ जण बाधित झाले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या संपर्कातील घरकाम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आता बाधित रुग्णांची संख्या १३ झाली आहे. त्या महिलेच्या संपर्कातील १९ जणांना आरोग्य विभागाकडून क्वारंटाईन करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून त्या परिसरात पुन्हा सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाला कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे. ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये व शासनाच्या नियमांचे पालन करावे. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागासह जि.प.चे माजी उपाध्यक्ष उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे आदींनी केले आहे.दरम्यान, शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूही पाळला. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.