शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर परिचारिका करतेय रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 20:28 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीच्या नैसर्गिक आपत्तीत रूग्ण सेवेला प्रधान्य देऊन तळोदा तालुक्यातील प्रतापपूर ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना महामारीच्या नैसर्गिक आपत्तीत रूग्ण सेवेला प्रधान्य देऊन तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका गरोदर असतानाही रूग्णांची तपासणी करून रूग्ण सेवा करीत आहेत. तिच्या या स्तुत्य कामाचे कौतुक केले जात आहे.तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अश्विनी प्रताप पावरा ही महिला परिचारिका २०१७ पासून कार्यरत आहे. सध्या ही परिचारिका गरोदर आहे. तथापि, देशासह संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य महामारीने अक्षरश: कहर केला आहे. देशभरात दिवसागणिक रूग्ण संख्येतदेखील मोठी वाढ होत आहे. जीवघेणा रोग असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.साधा, ताप, खोकल्याचा त्रास रूग्णाला जाणवू लागला तरी रूग्णांमध्ये प्रचंड तणाव निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. प्रतापपूर आरोग्य केंद्रात अशी लक्षणे असलेले रूग्ण उपचारांसाठी दाखल होत आहेत. अशा रूग्णांची तपासणी ही परिचारिका करीत आहे. घाबरलेल्या या रूग्णांना कोरोनाबाबत माहिती देऊन त्यांना काळजी घेण्याबाबतचे समुपदेशनदेखील त्या करीत आहेत. एवढेच नव्हे तर ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या रूग्णांना पुढील तपासणीसाठी त्या आमलाड येथे पाठवित असल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर प्रत्येक रूग्णाने आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी घरात स्वच्छता पाळा, एका-एका तासाने साबणाने हात धुवा, खोकलताना व शिंकतांना तोंडाला रूमाल लावा, आपले घर परिसर स्वच्छ ठेवून घराबाहेर पडू नका. त्यामुळेच कोरोनाला प्रतिबंध घालता येईल, असा सल्लादेखील त्या रूग्णांना देत असतात. वास्तविक त्या गरोदर आहेत, असे असतांना केवळ देशासमोरील संकट लक्षात घेऊन आणि रूग्णांची सेवा करण्याच्यव हेतूने अशा परिस्थितीत काम करीत आहेत.साहजिकच त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात असून, रूग्णांच्या काळजीबरोबरच त्या आपली काळजीदेखील घेत आहेत. सोबत आपल्या कुटुंबाचीदेखील काळजी घेत आहे. त्यांच्या रूग्णसेवेस कुटुंबाचाही प्रतिसाद मिळत असल्याचे त्या सांगतात.