शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्राय रन’ची परीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र व नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. एकूण ७४ जणांची नेमणूक त्यासाठी करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत या सराव चाचणीचा सकाळी नऊ वाजता शुभारंभ करण्यात आला.यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. भारुड म्हणाले, ड्राय रनच्या माध्यमातून लसीकरणात येणाऱ्या अडचणी लक्षात येतील आणि त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येईल. या सराव चाचणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होईल. दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी देखील प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे . या भागात सीएसआर निधीतून आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात लसीकरणाच्या वेळी समस्या येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सराव चाचणीची पाहणी केली. राज्यात नंदुरबारसह पुणे, नागपूर आणि जालना या चारच जिल्ह्यांची ड्राय रनसाठी निवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील तिन्ही ठिकाणी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली. वीज, इंटरनेट, सुरक्षेसोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षाच्या तयारीचे अवलोकन यावेळी करण्यात आले.नवापूर उपजिल्हा रुग्णालयात सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ड्रायरन सुरू करण्यात आले. २५ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सर्वात आधी डॉ प्रदीप गावित यांचावर ड्रायरन लसीकरणाचे प्रत्याक्षिक करण्यात आले. कोरोना लसीकरण संदर्भात केंद्र व  नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.