शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्याबाहेरील चौफुली ठरताय जीवघेण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:11 IST

उपाययोजनेची अपेक्षा : वाढते अतिक्रमण व रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनधारक हैराण

शहादा : शहरालगत लोणखेडा बायपास रस्त्यालगत रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर  आहे. रस्ता मोकळा झाल्याने वाहनधारकांचा त्रास कमी झाला. मात्र डोंगरगाव व मोहिदा फाटा या दोन ठिकाणी वाढणारे अतिक्रमण वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे.शहादा शहराच्या पूव्रेला लोणखेडा बायपास रस्त्याजवळ कोळदा ते सेंधवा दरम्यान होणारे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दोंडाईचा रस्ता ते दरा फाटार्पयतचे रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रस्ता रुंद झाल्याने वाहनधारकांसाठी सोयीचा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्याही वाढली आहे. याच       रस्त्यावर डोंगरगाव रस्ता, शहराकडे येणारा रस्ता, दोंडाईचा रस्ता व जुना मोहिदा रस्त्यालगत अतिक्रमण वाढू लागले आहे. हे अतिक्रमण वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत असून डोंगरगाव रस्ता व मोहिदा  फाटा याठिकाणी गेल्या दोन वर्षात चार जणांना प्राणास मुकावे लागले आहे.डोंगरगाव व शहाद्याकडे येताना रस्ता ओलांडताना वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. चारही दिशेने ये-जा करणा:या लहान-मोठय़ा वाहनांना याठिकाणी वाढणारे अतिक्रमण अडचणीचे ठरत आहे. त्यातच रस्ता चढ-उताराचा असल्याने त्यात भर पडते. जुना मोहिदाकडे जाणा:या रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. याठिकाणी दुचाकीस्वार घसरून जखमीही होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे 200 मीटर अंतरार्पयत खडी असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ही खडी मोठय़ा वाहनांच्या टायरखाली येऊन उधळते. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारी जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शहराबाहेरील सर्वच चौफुलींवरील अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीयोग्य करण्याची अपेक्ष वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, शहादा शहराबाहेरून बायपास रस्त्याने वाहतूक वाढल्याने अवजड वाहनांसह लहान वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे या चौफुली परिसरातील रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम करण्याची गरज आहे. नवीन रस्ते तयार झाले  तर होणारे अपघात टाळता येतील. तसेच वाहनधारकांना वाहने चालविताना होणारा त्रासही कमी होणार आहे.