शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार महिन्यात जिल्हाधिका:यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची अवघ्या साडेचार महिन्यात  बदली झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची अवघ्या साडेचार महिन्यात  बदली झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुळचे सामोडे, ता.साक्री येथील रहिवासी राजेंद्र भारुड यांची बदली झाली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी तथा नंदुरबार आदिवासी प्रकल्पाधिकारी वान्मती सी. यांची धुळे जि.प.च्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची 25 फेब्रुवारी नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळातील 45 दिवस लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेले. त्यानंतर 16 जुलै रोजी त्यांच्या बदलीचे आदेश येथे प्राप्त झाले.  त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांची बदली करण्यात आली आहे. भारूड हे मुळचे सामोडे, ता.साक्री येथील रहिवासी आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक देखील अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. लवकरच ते पदभार घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.वान्मती सी. यांचीही बदलीदीड वर्षापूर्वी येथे नियुक्ती झालेल्या प्रांताधिकारी तथा नंदुरबार आदिवासी प्रकल्पाधिकारी वान्मती सी. यांची देखील बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.