शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

खावटी कजर्माफी ठरली केवळ घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी बांधवांनी घेतलेले खावटी कर्ज माफ करण्याचे चार महिन्यांपूर्वी शासनाने जाहिर केले होत़े घोषणेनंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी बांधवांनी घेतलेले खावटी कर्ज माफ करण्याचे चार महिन्यांपूर्वी शासनाने जाहिर केले होत़े घोषणेनंतर तात्काळ कजर्माफी होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कजर्माफीची प्रक्रियाच आजवर सुरु केली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आह़े  यामुळे आदिवासी बांधवाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा ‘जैसे थे’ आह़े   भूमिहीन, अल्पभूधारक आणि शेतमजूरी करणा:या आदिवासी बांधवांची जून ते सप्टेंबर या काळात उपासमार होऊ नये म्हणून आदिवासी विकास विभागाने खावटी कर्ज योजना केली होती़ 1978 पासून सुरु असलेल्या या योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थीना दोन ते तीन हजार रुपये देण्यात येत होत़े कालांतराने रकमेत वाढ करुन ती 4 हजार रुपयांर्पयत नेण्यात आली़ 2009 ते 20014 या काळात नंदुरबार जिल्ह्यात एकूण 1 लाख 69 हजार 304 आदिवासी लाभार्थीना 36 कोटी 17 लाख 11 हजार 364 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होत़े या कर्जाची वसुली गेल्या पाच वर्षात सातत्याने सुरु होती़ शासनाने निवडणूकीपूर्वी कजर्माफी घोषित केल्यानंतर खावटी कर्जाची वसुली थांबवली जाण्याची अपेक्षा होती़ परंतू प्रत्यक्षात वसुली प्रक्रिया सुरुच राहिली होती़ यामुळे शासकीय अधिसूचनेनंतर कर्ज वसुल केलेल्या आदिवासी बांधवांच्या कजर्माफीचे काय असा, प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े नंदुरबारसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही गत चार वर्षात खावटी कर्जाची वसुलीसाठी लाभार्थीना नोटीसा देण्यात आल्या होत्या़    महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून झालेल्या वसुली रकमेबाबत शासनाने गांभिर्याने विचार करण्याची गरज असल्याचे जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थीचे म्हणणे आह़े नंदुरबार जिल्ह्यात 2009-10 या वर्षात 36 हजार 500 लाभार्थीना 11 कोटी 10 लाख, 2010-11 या वर्षात 79 हजार 584 लाभार्थीना 24 कोटी 33 लाख, 2011-12 या वर्षात 29 हजार 47 लाभार्थीना 9 कोटी 10 लाख, 2012-13 या वर्षात 18 हजार 776 लाभार्थीना 5 कोटी 73 लाख, 2013-14 या वर्षात 8 हजार 474 लाभार्थीना 2 कोटी 57 लाख रुपयांचे खावटी कर्ज वाटप करण्यात आले होत़े पाच वर्षात एकूण 1 लाख 72 हजार 381 लाभार्थीना 52 कोटी 85 लाख 61 हजार रुपयांची रक्कम वाटप झाली होती़ लाभार्थीना 30 टक्के अनुदानाप्रमाणे 15 कोटी 85 लाख 68 हजार 300 तर 70 टक्के अनुदानाप्रमाणे 36 कोटी 99 लाख 92 हजार 700 रुपयांचे वाटप करण्यात आले होत़े खावटी कजर्वाटप करण्यात आल्यानंतर शासनाकडून सातत्याने वसुलीचा तगादा लावला गेला होता़ यांतर्गत पाच वर्षात 3 हजार 77 लाभार्थीनी कर्ज परतावा केला होता़ त्यांनी महामंडळाला 83 लाख 81 हजार 336 रुपये परत केले होत़े कजर्माफीच्या घोषणेनंतरही आदिवासी लाभार्थीना कर्ज परताव्यासाठी नोटीसा पाठवणे सुरुच राहिले होत़े  नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 69 हजार 304 लाभार्थीचे 36 कोटी 17 लाख 11 हजार 364 रुपयांचे कर्ज शासनाने माफ करण्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याची माहिती आह़े यामुळे महामंडळाने खावटी कर्ज वाटपाची माहिती नव्याने संकलित करण्याचे कामही सुरु केल्याचे सांगण्यात आले आह़े