शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

वृक्षतोड परवाणगीचे अवघे १८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिका हद्दीत वर्षभरात केवळ १८ जणांनी झाड तोडण्याचे अर्ज केले होते. जुने वृक्ष तोडण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका हद्दीत वर्षभरात केवळ १८ जणांनी झाड तोडण्याचे अर्ज केले होते. जुने वृक्ष तोडण्याची गेल्या सहा महिन्यात जणू स्पर्धाच लागली आहे. मध्यवस्तीत अनेक जुने व डेरेदार वृक्ष जमिनदोस्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ते तोडण्यासाठी पालिकेकडे साधा अर्ज दिला गेला. वन विभगाची ‘ना हरकत’ घेतली गेली नाही. असे असतांना पालिकेने कुठल्या आधारावर वृक्ष तोडण्यास परवाणगी दिली याची चौकशी होणे आवश्यक आहे. शिवाय संबधितांवर देखील गुन्हे दाखल करावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.वर्षभरापूर्वी नंदुरबारातील माणिक चौकातील एक डेरेदार आणि जुने वृक्ष तोडण्यात आले होते. त्याबाबत काहींनी तक्रारी केल्या परंतु काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे इतरांना वृक्ष तोडीबाबत हिंमत आली. त्यामुळे गणपती मंदीर परिसर, नेहरू चौक, शेतकी संघ आॅफीस जवळ, हाटदरवाजा परिसर, सिंधी कॉलनी यासह परिसरातील अनेकांनी वृक्ष तोडले. त्यांच्यावरही कुणी करवाई केली नाही.बांधकाम अभियंता वृक्ष अधिकारीपालिका क्षेत्रात एका वृक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागते. सहसा बांधकाम विभागाचे अभियंता हेच वृक्ष अधिकारी असतात. शिवाय एक समिती देखील असते त्या समितीचे अध्यक्ष हे मुख्याधिकारी असतात. वृक्ष अधिकाºयाकडे अर्ज केल्यावर सात दिवसाच्या आत झाड तोडण्याची परवाणगी देणे किंवा नाकारावी लागते.जर एखादे झाड जिर्ण झाले असेल, वीज तारांना धोका असेल, रहदरीस अडथळा येत असेल, पडण्याचा धोका असेल तर असे झाड तोडण्याची लागलीच परवाणगी द्यावी लागते. जर झाड मोठे असेल तर वन विगागाची ना हरकत असावी लागते. या सर्व प्रक्रिया करूनच झाड तोडता येते. शिवाय जेव्हढी झाडे तोडाला त्या संख्येने नवीन झाडे लावावी लागतात. तसे लिहून द्यावे लागते.लाकूड गेले कुठेनंदुरबारात दहा ते बारा मोठी आणि जुनी वृक्षे तोडण्यात आल आहेत. या वृक्षांचे लाकूड कुठे विकले गेले, वन विभागाची त्यासाठी परवाणगी घेतली का? ज्या सॉ मिलने हे लाकूड खरेदी केले त्यांनी देखील वन विभागाला कळविले का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हजारो रुपयांचे लाकूड विक्रीचे पैसे कुणाच्या घशात गेले याबाबत वन विभागाने देखील चौकशी करणे आवश्यक आहे.वीज कंपनीकडून सर्रास कत्तलवीज कंपनी देखील पावसाळ्याच्या सुरुवातीला वीज तारांना अडचणीचे ठरणारे झाडांच्या फांद्या तोडल्य जातात. त्याला कुणाची हरकत नसते. पावसाळ्यात अपघात होऊ नये यासाठी ही मोहिम असते. परंतु वीज कंपनीच्या आडून अनेक जण आपले इप्सित साध्य करीत असतात.तोडलेल्या वृक्षाचे खोड उभेतोडलेल्या जुन्य वृक्षांचे खोड आजही ठिकठिकाणी उभे आहे. ‘लोकमत’ल गुरुवारी बातमी येताच असे खोड गायब करण्याचे काम काहींनी सुरू केले होते. तर काहींनी खोडाच्या आजूबाजूला काही वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला.याशिवाय अनेकांनी ‘लोकमत’ला फोन करून कुठल्या भागात आणखी वृक्षतोड झाली आहे याची माहिती देण्यचा प्रयत्न केला.नंदुरबार पालिकेकडे गेल्या वर्षात केवळ १३ जणांनी झाड तोडण्यासाठी अर्ज केले होते.चालू वर्षात आतार्पंत १८ जणांनी अर्ज केले होते.अर्ज हे केवळ अडचणीचे ठरणारे झाडे तोडणे, त्यांच्या फांद्या तोडणे, जिर्ण झाडं तोडणे या स्वरूपाचे होते.अनेकांनी घरे बांधणे, शॉपींग कॉम्पलेक्स बांधणे यासाठी मोठ्या झाडांचा बळी दिला असल्याचे दिसून येते.झाडं तोडलेल्या व्यक्तींनी नवीन झाडं लावली का?, ती जगली का? याची शहनिशा मात्र पालिकेकडून झाली नाही.ही झाडे तोडता येत नाहीत...हिरडा, साग, चिंच, आंबा, जांभूळ, खैर, चंदन, तिवस, अंजन, फणस, किंजळ, हळदू, बिजा, ऐन, मॅन्ग्रोव्ह ही झाडे तोडण्यास सक्त मनाई आहे.बांधकाम परवाणगीसाठीही अट...घर, व्यावसायिक इमारत अथवा इतर कुठल्याही बांधकामासाठी पालिका बांधकाम परवाणगी देतांना वृक्ष लागवडीची अट टाकते. परंतु ती अट कितीजण पुर्ण करतात. पालिका देखील त्य अटीप्रमाणे कार्यवाही करते का? हा प्रश्नच आहे.