शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार प्रांतकडून जातीचा दाखला ऑनलाईन डिजीटल स्वाक्षरीने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जातीचे दाखले व नॉन क्रिमिलीयरचे दाखले प्रांताधिका:यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतने मिळणार आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जातीचे दाखले व नॉन क्रिमिलीयरचे दाखले प्रांताधिका:यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतने मिळणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा देखील वाचणार आहे. नंदुरबार प्रांताधिकारी वान्मती सी. यांनी याबाबतची माहिती दिली.नंदुरबार व नवापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना जातीचे दाखले व नॉन क्रिमिलीयरचे दाखले मिळविण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागत होती. त्यामुळे वेळ व पैसा देखील खर्च होत होता. आता ती गैरसोय टाळण्यासाठी नंदुरबार प्रांताधिकारी वान्मती सी. यांनी डिजीटल स्वाक्षरीने असे दाखले ऑनलाईन वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. याआधी हे दोन्ही दाखले मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात सेतू तसेच ठिकठिकाणच्या आपले सरकार सेवा केंद्र व महाईसेवा केंद्रात अर्ज दाखल केले जात होते. नंतर हे दाखले तयार करून स्वाक्षरीसाठी नेत असत. तेथून स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वाक्षरीकामी सादर करण्यात येत होते. त्यात त्रुटी निघाल्यास दाखला आणखी लांबणीवर पडायचा. या सर्व प्रक्रियेत वेळ आणि पैसा वाया जात होता. त्यामुळे प्रांताधिकारी वान्मती सी. यांनी सर्व महाईसेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र परिचालकांची बैठक घेवून ऑनलाईन दाखल्यांबाबत मार्गदर्शन केले.  ठराविक दिवसानंतर त्याच ठिकाणी डिजीटल स्वाक्षरी असलेली दाखल्याची प्रिंट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दाखले गहाळ होणे हा विषयच संपणार असून सर्वच बाबींची बचत होणार आहे. दाखला हातोहात देणे, अजर्ट पाहिजेच या सबबी आणि प्रकार बंद होणार आहे. नंदुरबार व नवापूर तालुक्यात या नव्या प्रकाराला तात्काळ सुरूवात देखील करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.