शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार बाजारात आवक घसरल्याने कांद्याला प्रथमच मिळाला उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीत होणारी कांदा आवक घसरल्याने यंदाच्या हंगामात प्रथमच कांदा दर हे प्रतीक्विंटल 4 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीत होणारी कांदा आवक घसरल्याने यंदाच्या हंगामात प्रथमच कांदा दर हे प्रतीक्विंटल 4 हजार 200 रुपयांर्पयत गेले आहेत़ बाजारात आवकच नसल्याने सडका आणि काजळी लागलेल्या कांद्याला निम्मे दर मिळत असल्याचे चित्र सध्या बाजारात आह़े   धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात उत्पादित केलेला कांदा शेतकरी नंदुरबार बाजार समितीत विक्रीसाठी आणतात़ हमखास दरांची शाश्वती असल्याने येथे कांदा खरेदी विक्रीतून दर दिवशी हजारो रुपयांची उलाढाल होत़े शासनाने शेतक:यांना कांदा अनुदान देण्याच्या घोषणेनंतर मात्र गेल्या सहा महिन्यात येथील कांदा बाजारपेठेला घरघर लागली आह़े यातून राज्यासोबतच जिल्ह्यातील सामान्यांना ‘कांदाटंचाई’चा सामना करावा लागत आह़े गत सहा महिन्यांपूर्वी दर दिवशी किमान 50 क्विंटलर्पयत होणारी कांदा आवक आता 20 क्विंटलवर आली आह़े शेतकरी 20 आणि 40 किलोच्या कट्टय़ात कांदा आणत आहेत़ दर दिवशी 35 ते 70 कट्टे कांदा येत असल्याने व्यापा:यांनाही अडचणी येत आहेत़ भाजीपाला बाजारात विक्री होणा:या या कांद्याला मंगळवारी दुपारी प्रतीक्विंटल 4 हजार 200 रुपयांचा दर देण्यात आला़ परिणामी बाजारात कांदा दर हे प्रतिकिलो 50 रुपये एवढे होत़े आवक होणारा हा कांदा कमी प्रतीचा असल्याने त्याची देखभाल करुन साठा करणे व्यापा:यांना जिकिरीचे जात असल्याने अनेकांकडून खरेदीही टाळली जात आह़े बाजारात प्रामुख्याने आवक होणारा कांदा हा रांगडा कांदा म्हणून परिचित आह़े शेतक:यांनी साठा करुन ठेवलेल्या सर्वाधिक कमी दर्जाचा कांदा येथील बाजारात विक्रीसाठी आणला जात असून कांदा अनुदान मिळत नसल्याने चांगल्या दर्जाचा कांदा राज्यातील इतर बाजारपेठ आणि परराज्यात विक्रीसाठी नेला जात आह़े यात शेतक:यांना वाहतूक खर्चाचा फटका बसत आह़े