शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
6
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
7
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
8
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
9
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
10
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
11
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
12
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
13
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
14
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
15
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
16
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
17
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
18
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
19
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
20
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...

नवापूर पालिका पोटनिवडणुकीत काँग्रेस व भाजपला प्रत्येकी एक जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : येथील पालिकेच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपास प्रत्येकी एक जागा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : येथील पालिकेच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपास प्रत्येकी एक जागा मिळाली.पालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा (अ) व सात (अ) मधील काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांचे इतर मागासवर्ग प्रवर्ग जात प्रमाणपत्र अमान्य करण्यात आल्याने या दोन प्रभागात पोटनिवडणुक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत प्रभाग सहा मध्ये तीन उमेदवार तर प्रभाग सात मध्ये चार उमेदवारांमधे लढत झाली. काल रविवारी ५५ टक्के मतदान झाले. पालिकेच्या बहुउद्देशिय नगरभवनात आज सकाळी दहाला मतमोजणी करण्यात आली. तीन फेऱ्यात मत मोजणी पूर्ण झाली. प्रभाग क्रमांक सहा मधून महाविकास आघाडीच्या सुरेखा प्रकाश जगदाळे (काँग्रेस) १२१ मतांच्या आघाडीने विजयी झाल्या. त्यांना ८४३ मते मिळालीत. भारतीय जनता पार्टीच्या जीग्नेषा संदीप राणा यांना ७२२ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार फॅमिदा फिरोज फॅन्सी यांना ३४ मते व नोटा विकल्पात २८ मते नोंदविण्यात आलीत. प्रभाग सात मधून भारतीय जनता पक्षाचे महेंद्र अशोक दुसाणे हे २२५ मतांच्या आघाडीने विजयी झाले. त्यांना ९८४ मते मिळालीत. महाविकास आघाडीचे डॉ. मनोज रमेश चव्हाण (शिवसेना) यांना ७५९ मते, अपक्ष गणेश भानुदास वडनेरे यांना ११६ मते, सुनील धाकु भोई यांना ३६ मते तर नोटा विकल्पात २१ मते पडले.विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडुन जल्लोष केला. प्रभागातील मतदारांच्या भेटी घेउन विजयी उमेदवारांनी आशिर्वाद घेतले. पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपुत यांच्या नेतृत्वात दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे पुरुष व महिला कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, सहाय्यक निवडणूक अधिकारी व पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, पालिका अधिक्षक मिलिंद भामरे, अनिल सोनार, मनोज पाटील व सहकारी यांनी परिश्रम घेतलेत.