शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील अहिल्यादेवी विहिरीत पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मध्य व दाट लोकवस्तीत असलेल्या अहिल्यादेवी विहिरीत सकाळी ११ वाजता एकाचा मृतदेह आढळून आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्य व दाट लोकवस्तीत असलेल्या अहिल्यादेवी विहिरीत सकाळी ११ वाजता एकाचा मृतदेह आढळून आला. मयत हा नंदुरबारातील चिराग गल्ली परिसरात राहणारा आहे. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विहिरीला कुंपन केलेले आहे. परंतु गेट उघडे राहत असल्यामुळे ही घटना घडली. विहिर कायमस्वरूपी बंदीस्त ठेवावी अशी मागणी होत आहे. यापूर्वीही या विहिरीत अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.बदरुज्जमाखान अजीजउल्लाखान खतीम (४५) रा.चिरागगल्ली असे मयताचे नाव आहे. त्याचा भाऊ शफीउल्ला खतीम यांनी याबाबत फिर्याद दिली. सकाळी भाऊ कामानिमित्त बाहेर जातो असे सांगून गेला. दुपारी साडेअकरा वाजता भाऊ अहिल्यादेवी विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. दरम्यान, विहिरीत एक व्यक्ती पडल्याचे समजल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. खतीम यांना बाहेर काढले असता काहींनी त्यांना ओळखले. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, विहिरीत यापूर्वी झालेल्या आत्महत्या लक्षात घेता कुंपन करण्यात आले आहे. परंतु एक दरवाजा उघडा राहत असल्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे विहिर बंदीस्त करावी अशी मागणी करण्यात येत आहे. विहिरीतील मंदीरात श्रावण महिन्यात पुजेसाठी काहीजण येत असल्याने हा दरवाजा उघडा ठेवल्याचे सांगण्यात आले.