शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

कोविड लसीसाठी एक कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सदस्यांना कोविडची लस मोफत देण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सदस्यांना कोविडची लस मोफत देण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, स्वत: नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी या सर्व शहरवासीयांनी लस टोचल्यानंतर त्या स्वत: लस टोचून घेणार आहेत.कोविड लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यासाठी देशभर तयारी सुरू करण्यात आली आहे. लसीची किंमत किमान २२० रुपये इतकी आहे. दोन लस घ्यावयाच्या असल्यामुळे एका जणाला ४४० रुपये लागणार आहेत. सद्या तरी मोफत लस देण्यासंदर्भात काहीही सुतोवाच नाही. त्यामुळे गरीब जनता त्यापासून वंचीत राहू नये याकरीता नंदुरबार पालिकेेने आधीच तरतूद करून घेतली आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या निधीची तरतूद करणारी नंदुरबार पालिका ही एकमेव ठरली  आहे. नंदुरबार शहरात साधारणत: चार हजार बीपीएल कुटूंब आहेत. एका कुटूंबात पाच सदस्य धरले तरी २० हजार बीपीएल नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे या नागरिकांना किमान एक कोटी रुपयांची तरतूद पालिकेने केली आहे. शासनाकडून मोफत लस देणे किंवा निधीची तरतूद झाली तर ठिक अन्यथा पुन्हा पालिका निधीच्या तरतुदीसाठी पुढाकार घेणार आहे. स्थायी समितीची नुकतीच सभा झाली. या सभेत या निधीला मान्यता देण्यात आली असून लवकरच सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यामुळे गरीब नागरिकांना मोफत कोविड लस मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शहरातील सर्व नागरिकांना लस मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वत: लस टोचणार नाही असा संकल्पही नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात आरोग्य विषयक इतरही विविध बाबींची  तरतूद करण्यात आली आहे. त्यात मोहल्ला क्लिनीक योजना, डायलेसीस सेंटर व पॅथोलॅाजी लॅब यासह इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकुण अंदाजपत्रक हे साधारणत: १४ लाख ८६ हजार ६८६ रुपये शिल्लक असणारे राहणार  आहे. 

नंदुरबार पालिकेने नेहमीच सर्वसामान्य नागरिकांचे हित पाहिले आहे. कोरोना काळातही सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न राहिला आहे. आता कोविडची लस बीपीएल कुटूंबांना मिळावी यासाठी एक कोटींची तरतूद केली आहे. स्वत: मी सर्वात शेवटी लस टोचून घेणार आहे. नागरिकांचे हित व त्यांचे आरोग्य याला प्रथम प्राधान्य देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,नगराध्यक्षा, नंदुरबार.