शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

529 सदस्यपदाच्या जागांसाठी दीड हजार उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:10 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील ८७ पैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातून माघारीच्या अंतिम दिवशी ६६५ सदस्यपदापैकी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील ८७ पैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातून माघारीच्या अंतिम दिवशी ६६५ सदस्यपदापैकी १३६ ग्रामपंचायती सदस्यपदे बिनविरोध झाल्याने ५३९ सदस्यपदाच्या जागांसाठी १ हजार ४२९ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.             जिल्ह्यात अंतिम मुदतीअंती एकूण २ हजार ५६  उमेदवारी अर्ज दाखल नंतर एकूण ४५ अर्ज अवैध ठरले होते. वैध अर्ज माघारी घेण्याची मुदत ही सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. यांतर्गत नंदुरबार तालुक्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. एकूण १९४ जणांनी अर्ज माघारी घेतले. शहादा तालुक्यातील एकूण ६४८ पैकी १९९ जणांनी माघार घेतल्याने त्याठिकाणी ४४९ जण निवडणूक रिंगणात आहेत. नवापूर तालुक्यात १४ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने त्याठिकाणी एकूण २२९ उमेदवार रिंगणात आहेत. धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जांपैकी ७९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तसेच  चार प्रभाग बिनविरोध होवून ३३३ उमेदवार रिंगणात आले.  तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी १३४ उमेदवार रिंंगणात आहेत. 

शहादा व नंदुरबार तालुक्यांकडेच लागले संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या ग्रामपंचायत निवडणूकीत शहादा तालुक्यातील मोहिदे तर्फे शहादा, असलोद, शेल्टी व सारंगखेडा या मोठ्या गावांमध्ये निवडणूक होत आहे. सोबत नंदुरबार तालुक्यातील भालेर आणि कोपर्ली या दोन मोठ्या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये मतदान प्रक्रिया होणार असे स्पष्ट झाले असून याठिकाणी प्रचार सुरु झाला आहे. 

सारंगखेडा ग्रामपंचायतीची निवडणूक ठरणार लक्ष्यवेधी चेतक महोत्सव व एकमुखी दत्त मंदिरासाठी संपूर्ण देशात ओळखल्या जाणा-या सारंगखेडा ता. शहादा ग्रामपंचायतीच्या ६ प्रभागात १७ सदस्यपदाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. रिंगणात ३६ उमेदवार आहेत. यापैकी कोण विजयी होणार याचे आडाखे बांधले जात आहे. ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चित ग्रामपंचायत आहे. 

पुरूष व महिलांचे प्रमाण सारखेच निवडणूक लढवणा-या १ हजार ५०४ उमेदवारांपैकी आरक्षित जागा तसेच अनारक्षित जागांवर पुरूष आणि महिलांचे प्रमाण समसमान असल्याचे समाेर आले आहे. २२ ग्रामपंचायती व काही प्रभाग बिनविरोध झाल्याने हा समतोल झाल्याचे दिसून आले आहे. धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये पुरूष उमेदवारांची संख्या अधिक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती ६४

एकूण प्रभागाची संख्या  २००

उमेदवार निवडणूक रिंगणात १४२९

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यक्रम सुरु आहे. माघारीनंतर उमेदवार आणि किती प्रभागात मतदान होईल हे स्पष्ट झाले आहे. काही गावे बिनविरोध झाली आहेत. यामुळे मतदान यंत्रे कमी लागून प्रशासनावरचा ताणही कमी होणार आहे. बिनविरोध निवडणूकांमुळे गावागावातील राजकीय संघर्षही मिटला आहे. -बालाजी क्षीरसागर, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, नंदुरबार.