शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

‘निरिक्षण’मुळे दुर्गम भागातही झाली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागांतर्गत नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयाने तयार केलेल्या ‘निरीक्षण’ अ‍ॅपमुळे विविध विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागांतर्गत नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयाने तयार केलेल्या ‘निरीक्षण’ अ‍ॅपमुळे विविध विकास योजनांची वस्तुनिष्ठ माहिती मिळत असून कामकाजात गती आणण्यात मदत होत आहे.आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी यांनी विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभागात आणि विशेषत: नंदुरबार जिल्ह्यात नव्या संकल्पना राबविण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी वसुमना पंत आणि अविश्यांत पांडा यांनी दैनंदिन कामकाजाचे विश्लेषण आणि अवलोकन करण्यासाठी या अ‍ॅपची संकल्पना पुढे आणली आहे. दोन महिन्यापूर्वीच अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. प्रायोगिक तत्वावर वापर करताना निदर्शनास आलेल्या त्रूटी दूर करून त्याचे अधिक विकसीत रुप आता नियमित उपयोगात आणले जात आहे. अ‍ॅपमध्ये आश्रमशाळा, वसतीगृहे, पायाभूत सुविधा, आदिवासी विकास विभागाच्या योजना, अंमलबजावणी, कार्यालयातील गरजा आदी विविध बाबींचा समावेश आहे.सर्व अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा दैनदिन स्वरुपात अ‍ॅपवर माहिती अपडेट करतात. त्यामुळे प्रत्येक पातळीवर होणाºया कामांचे अवलोकन व सद्यस्थितीविषयी वरिष्ठांना माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे. कामातील तफावत किंवा त्रुटीदेखील यामुळे वेळीच समजणार आहेत.दुर्गम भागात अधिक क्रियाशील संवादाच्या माध्यमातून कामकाजाला गती देणे यामुळे शक्य होणार असल्याचे नंदुरबारच्या सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. तर तळोद्याचे प्रकल् अधिकारी अविश्यांत पांडा यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन, शैक्षणिक सुधारणा, माहिती व्यवस्थापन, कार्य नियोजन आणि समस्या कालबद्धरितीने दूर करण्यासाठी निरीक्षण अ‍ॅपचा चांगला उपयोग होणार आहे.दैनंदिन कामकाजाच्या अवलोकनासाठीदेखील अ‍ॅप उपयुक्त ठरले असल्याचे सांगितले. अ‍ॅपवर आॅफलाईन सुविधादेखील देण्यात आली असल्याने अक्कलकुवा आणि धडगावच्या दुर्गम भागातील शिक्षकांची उपस्थिती, भोजनाचा दर्जा, योजनांची अंमलबजावणी यांचे संनियंत्रण आता चांगल्याप्रकारे करता येत आहे.

  • जिल्ह्यातील ७२ आश्रमशाळा आणि ४८ वसतीगृहांची वस्तुनिष्ठ माहितीे मिळणार आहे. आदिवासी जनतेसाठी विकासाचे कार्यक्रम राबवितांना आवश्यक असलेली माहितीदेखील यामुळे प्राप्त होणार आहे. प्रकल्प कार्यालयाशी संबंधित प्रत्येक घटकाला स्वतंत्रपणे अ‍ॅप वापरण्याची सुविधा देण्यात आली असून छायाचित्रे अपलोड करण्याची सुविधा असल्याने एखाद्या कामाची सद्यस्थितीदेखील तपासता येईल. दररोज सादर करावयाची विविध माहिती यावर उपलब्ध होणार असल्याने परस्पर संवादात वाया जाणाºया वेळ आणि पैशाचीही बचत होणार आहे.