शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरकर पाण्याबाबत यंदा चिंतामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : एकीकडे उन्हाची तिव्रता व लॉकडाऊन असूनही पालिकेचे नियोजन यशस्वी झाल्याने यंदा नवापुरातील पाणीपुरवठा गंभीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : एकीकडे उन्हाची तिव्रता व लॉकडाऊन असूनही पालिकेचे नियोजन यशस्वी झाल्याने यंदा नवापुरातील पाणीपुरवठा गंभीर न होता सुरळीत राहीला. नागरी तक्रारी यंदा झाल्या नाहीत हे विशेष.शहरासाठी जीवनदायीनी असलेल्या रंगावली नदीच्या पाण्यावर शहराचा पाणीपुरवठा अवलंबुन आहे. जीवनदायीनी रंगावली नदी १९८५ पर्यंत बारमाही होती. नंतरच्या काळात नदी कोरडी पडण्यास सुरूवात झाली व शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हळुहळु गंभीर होत गेला. रंगावली धरणातील सोडण्यात येणारे पाणी शहरापावेतो पोहोचत नाही तेव्हा नदीपात्र कोरडे पडून परिणामी शहरात पाणी संकट ओढवते.शहरात दररोज दोन वेळेस पाणी पुरवठा करण्याची पालिकेची परंपरा आहे. पालिकेच्या पाणी संकलन केंद्राला समांतर व मरीमाता मंदीराजवळ केटीवेअरच्या झालेल्या उभारणीमुळे नदीपात्रात पाणी साचते. त्यासह नदीपात्रातच सहा इंच व्यासाची विंधन विहीर असुन त्याद्वारे पाण्याचे संकलन व वितरण होत आले आहे.उन्हाळ्याची तीव्रता एकीकडे वाढत जावून तपमान ४० च्या पार गेले आहे. गत वर्षी रखरखत्या उन्हात याच काळात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे व विशेषत: महिलांचे हाल झाले होते. शहरातील सर्वच परिसरातील महिलांनी पालिकेत धडक देऊन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवकांना चांगलेच धारेवर धरले होते. शहरातील सेवाभावी नागरीक व पालिकेमार्फत टँकरने पाणीपुरवठा करूनही नागरीकांची ओरड कमी झाली नव्हती. गत वर्षी पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू असताना पालिकेत पाण्याच्या बाबतीत तक्रार घेऊन यावे लागत असल्याची महिलांची नाराजी उफाळून आली होती. एकूणच शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. गत वर्षी शहरातील प्रत्येक प्रभागात तत्कालीन आमदार सुरूपसिंग नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून बोअरवेल करण्यात येऊन हातपंप बसविण्यात आले.शहरात ग्रामपंचायतीच्या काळापासून पाणीपुरवठा योजना व त्याच्या वितरीका कार्यान्वित आहेत. नव्या वसाहतींमध्ये नव्याने वितरीका टाकण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी सात लाख, चार लाख व प्रत्येकी दोन लाख लीटर क्षमतेचे दोन असे एकूण चार जलकुंभ आहेत. लालबारी व लहान चिंचपाडा येथे प्रत्येकी दोन लाख लीटर क्षमतेचे दोन जलकुंभ निमार्णाधीन आहेत. दैनंदीन ५० लाख लीटर पाणी शुध्द करणारे जलशुध्दीकरण केंद्र अलिकडे कार्यान्वित करण्यात आले असून, सध्य:स्थितीत त्याचा वापर सुरू असल्याने शुध्द जल मिळत आहे. पालिकेने सिंचन विभागाकडून पाणी घेण्याची परवानगी घेतली असून दुसऱ्या टप्प्यातील पाणी आजच धरणातुन सोडण्यात आले आहे. हे पाणी रविवार पावेतो केटीवेअरमध्ये येवून त्याची साठवणूक झाल्यास १५ जुन पावेतो पाण्याचा साठा शहरासाठी उपलब्ध होणार आहे. यंदा पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही ओरड झाली नाही. पावसाळा लांबल्यास नदीपात्रातील सहा इंच व्यासाच्या विंधन विहीरीतुन पाण्याचे संकलन व वितरण करण्याची तयारी पालिकेने करून ठेवली आहे.नवापूर पालिका व नवापूर तालुका दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून एप्रिल २०१८ मध्ये रंगावली नदीपात्रात केटीवेअर जवळील गाळ काढण्यात आल्याने पाण्याच्या संचयाची क्षमता वाढीस आल्याचा लाभ शहराला होत आहे.उद्यासाठी हवे असणारे पाण्यासाठी आजच प्रयत्न व तजवीज होणे गरजेचे आहे हे ओळखुन ५४ कोटी रूपये खर्चाची योजना शासनाकडे सादर करण्यात आली आहे. रंगावली धरणातून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे शहरापर्यंत पाणी आणणे व इतर आवश्यक कामांचा त्यात समावेश आहे. लॉकडाऊनचे काळे ढग निवळल्यावर या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करू.-हेमलता पाटील, नगराध्यक्षा, नवापूर पालिका.शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण़्यासाठी ठोस उपाय योजना केल्या जातील. नागरिकांनी पाण्याचे महत्व जाणून त्याचा वापर काटकसरीने करा. पावसाचे प्रमाण कमी होत आहे, ही बाब चिंताजनक असून नागरीकांचे सहकार्य मिळाल्यास यंदा टंचाई जाणवणारच नाही, असे प्रयत्न आहेत.-रेणुका गावीत, सभापती, पाणीपुरवठा, नवापूर पालिका.