शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार क्विंटल तांदूळ दिला मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात गरीब, सर्वसामान्य जनतेची दोन वेळेची चूल पेटावी यासाठी प्रशासनाने त्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात गरीब, सर्वसामान्य जनतेची दोन वेळेची चूल पेटावी यासाठी प्रशासनाने त्यांच्या हक्काचे धान्य त्यांच्यार्पयत पोहचावे यासाठी युद्धपातळीर काम सुरू आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अवघ्या दोन दिवसात 38 हजार शिधापत्रिकाधारकांना तब्बल नऊ हजार क्विंटल तांदुळ मोफत वितरीत करण्यात आला आहे.याबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले, प्रधान मंत्री गरीब कल्याण येाजनेअंतर्गत दोन दिवसात जिल्ह्यातील 38 हजार शिधापत्रिकाधारकांना नऊ हजार 161 क्विंटल मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.  सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत आतापयर्ंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील दोन लाख 28 हजार 141 कार्डधारकांना 56 हजार 193 क्विंटल धान्य वाटप करण्यात आले आहे. शिधापत्रिकेवर नमूद दोन्ही येाजनेतील सुमारे 11 लाख 25 हजार नागरिकांना पाच किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना वेळेवर धान्य वितरण करण्यासाठी शासनाच्या निदेर्शानुसार नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याला नियमित वितरणासाठी एकूण गव्हाचे 26 हजार 840 क्विंटल आणि तांदुळाचे 37 हजार 820 क्विंटल नियतन प्राप्त झाले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 57 हजार 10 क्विटल तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. ई-पॉस मशिनने धान्य वितरीत करताना दुकानदाराला स्वत:चे बायोमेट्रीक उपयोगात आणून वितरण करण्याची अनुमती देण्यात आली आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय लाभाथ्र्यास 15 किलो गहू दोन रुपये प्रति किलो दराने व 20 किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने दिला जातो. तर 20 रुपये दराने एक किलो साखर देण्यात येते.जिल्ह्यात एकूण 88 टक्के कार्डधारकांना नियमित धान्याचे वितरण करण्यात आले आहे. नियमित धान्य घेतल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच किलो याप्रमाणे सदस्यसंख्येनुसार तांदूळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी तांदूळाचे वितरण सुरू करण्यात आले असून आतापयर्ंत अक्कलकुवा तालुक्यातील 52 शिधापत्रिका धारकांना 1,181 किलो, अक्राणी 562 शिधापत्रिका धारकांना 17.8 क्विंटल, नंदुरबार 13,567 शिधापत्रिका धारकांना 318 क्विंटल, नवापूर 5,649 शिधापत्रिका धारकांना 125 क्विंटल, शहादा 11 हजार 11 शिधापत्रिका धारकांना 283 क्विंटल आणि तळोदा तालुक्यातील 7,160 शिधापत्रिका धारकांना 169 क्विंटल तांदुळाचे वितरण करण्यात आले आहे. अंत्योदय योजनेतील 13 हजार 747 शिधापत्रिका धारकांना 341 क्विंटल तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 24,557 शिधापत्रिका धारकांना 574 क्विंटल तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे.धान्य वितरण नियमानुसार होण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष वितरणस्थळी भेटी देत आहेत. याशिवाय जि.प. शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक, केंद्र अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची पर्यवेक्षणाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. धान्य वितरणाचे वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. गरजूना नियमानुसार धान्य मिळावे याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जात असून आतापयर्ंत नियमानुसार वितरण न करणा:या दोन दुकानदारांचे परवाने आतापयर्ंत रद्द करण्यात आले आहे.