शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धडगावनजीक नऊ लाखांची अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST

मध्यरात्री शहादाकडून धडगावकडे अवैध दारूने भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती धडगावचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळाली. औताडे ...

मध्यरात्री शहादाकडून धडगावकडे अवैध दारूने भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती धडगावचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळाली. औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव पोलिसांनी चोंदवाडे (ता. धडगाव) फाट्यावर पहाटे पावणेचार वाजता सापळा रचून ट्रक (क्रमांक जीजे १६ डब्ल्यू ८५५४) अडविला. दरम्यान, ट्रक चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु ट्रकची तपासणी केली असता त्यात विना परवाना वाहतूक होणारी सुपर व्हिस्की या दारुचे १०० बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये प्रत्येकी १२ बाटल्या अशा एकूण १२० बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या असून त्याची नऊ लाख एवढी किंमत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याशिवाय १३ लाखांचा ट्रक असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र चोरले यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक मालसिंग उतऱ्या पाडवी रा. जुनीकरी पाडा (काकडदा) ता. धडगाव व मंगल हिम्मतसिंग पावरा रा. उमराणी बुद्रूक, ता. धडगाव या दोन जणांविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी मालसिंग उतऱ्या पाडवी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनानुसार संजय मनोरे, राजेंद्र जाधव, विनोद पाटील, महेश कोळी, गणेश मराठे, हिरालाल सोनवणे व अभिमन्यू गावीत यांच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे हे करीत आहेत.