शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोंढरे गावाजवळील लघुप्रकल्पाला गळती लागल्याने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेले लघुप्रकल्प 100 टक्के भरल्याने पाणी ओसंडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेले लघुप्रकल्प 100 टक्के भरल्याने पाणी ओसंडून वाहत आहे. मात्र या लघुप्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात गळती लागली असून भगदाड पडले आहेत. हा प्रकल्प फुटला तर लगतच्या चार ते पाच गावांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे प्रकल्पाला लागलेली गळती बंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.शहादा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील सर्वच धरणे व लघुप्रकल्प ओसंडून वाहत आहेत. लोंढरे गावाजवळील लघुप्रकल्पही पूर्ण भरला असून पाणी वाहत आहे. मात्र या प्रकल्पाच्या गळतीकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. या प्रकल्पाचे काम 1999 मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग कुकावल, कोठली, लोंढरेसह परिसरातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी होतो. चार पाटचा:यांद्वारे पाणी सोडून ते सिंचनासाठी वापरले जाते. या प्रकल्पात 13 वर्षापूर्वी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. त्यानंतर गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रकल्प पूर्ण भरला आहे. 13 वर्षात प्रकल्पाच्या भिंतींना मोठमोठे खड्डे पडले असून मोठे वृक्षही आहेत. त्यामुळे प्रकल्पाची भिंत कमजोर झाली असून काही ठिकाणी भगदाड पडले आहेत. प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत दुरुस्तीबाबत लोंढरे, कहाटूळ व जयनगर येथील ग्रामस्थांनी लघुपाटबंधारे विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी, जलसंपदा मंत्री यांच्याकडेही चार-पाच वर्षापासून लेखी तक्रारी केल्या. मात्र पाटबंधारे विभागासह सर्वाचेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या गावांमधील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. आता तरी संबंधित विभागाने या प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.

सद्यस्थितीत या प्रकल्पपाची पाण्याची पातळी सात ते साडेसात मीटर उंच असल्याने पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. प्रकल्पार्पयत जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. पायी जाणेही मुश्कील होते.  प्रकल्पाच्या भिंतीला पडलेल्या भगदाड व खड्डय़ांमधून पाणी वाहत आहे. ही भिंत अचानक फुटली तर जयनगर, निंभोरा, धांद्रे, मातकूट, बोराळे, कुकावल व कोठली या   गावात पाणी शिरून तेथील लोकांचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.