शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’चा देशव्यापी शुभारंभ एक स्वप्नच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:29 IST

टेंभली आठ वर्षानंतरही आधारहीन : नागरी सुविधांसाठी झटताहेत ग्रामस्थ

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आधार योजनेच्या  शुभारंभाने संपूर्ण भारतात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहादा तालुक्यातील टेंभली गावाची अवस्था ‘जैसे थे’ झाल्याने टेंभलीकर एक स्वप्न म्हणून आठ वर्षापूर्वीच्या त्या घटनेकडे पहात आहेत.29 सप्टेंबर 2010 रोजी देशातील महत्वाकांक्षी ‘आधार’ योजनेचा शुभारंभ तत्कालिन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग आणि युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या                  हस्ते मोठय़ा धुमधडाक्यात झाला होता. यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या               सहा दशकानंतर ख:या अर्थाने          टेंभली येथे  स्वातंत्र्याची पहाट उगवली होती. सुमारे दीड हजार लोकवस्तीच्या या दुर्लक्षित आदिवासी गावात प्रथमच शासनाचे लक्ष गेले. कंदील आणि चिमणीच्या प्रकाशात धूसर दिसणा:या या गावात ‘आधार’च्या निमित्ताने राजीव गांधी विद्युतीकरण योजनेतून झोपडी-झोपडीत वीज पोहोचली. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून गावात रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले, गटारी झाल्या, गावास रंगरंगोटी झाली, संपूर्ण गावाचे रुपच पालटल्याने टेंभलीच्या आदिवासी बांधवांना प्रथमच स्वातंत्र्याची जाणीव झाली. ग्रामस्थांचा आनंद गगनाला पोहोचला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षातच गावातील वीज गुल झाली. झोपडीतील विजेचे मीटर काढून घेण्यात आल्याने टेंभलीत पुन्हा कंदील आणि चिमणीचा धूसर प्रकाश पोहोचला.आज आठ वर्षानंतर टेंभलीची अवस्था देशातील इतर छोटय़ा खेडय़ांसारखीच झाली आहे. गावातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. अंगणवाडीचे काम अपूर्ण असल्याने ग्रामपंचायत कार्यालयात सध्या अंगणवाडी भरते. एक बोअरवेल आणि केवळ दोन हातपंप सुरू असून टेंभलीचा पाणीपुरवठा एवढय़ावरच आहे. गटारींची कामे अपूर्ण आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना रॉकेल मिळालेले नाही. रेशन घेण्यासाठी लोणखेडा येथे जावे लागते. रेशन दुकानदार मनमानी करीत असल्याने नियमित व पुरेसे रेशन मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. शासनाच्या योजना गावार्पयत पोहोचत नाही. पोहोचल्या तरी लाभ मिळविण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. ग्रामसेवक नियमित येत नसल्याने मुलांचे दाखले आणि शासकीय कागदपत्र मिळविण्यासाठी ग्रामस्थांना ग्रामसेवकांची प्रतीक्षा करावी लागते.‘आधार’च्या शुभारंभाप्रसंगी शहाद्याच्या तलाठय़ांपासून ते दिल्लीच्या सचिवांर्पयत सर्वच अधिकारी आणि कर्मचा:यांनी टेंभलीची वारी केली होती. आज मात्र टेंभलीचा कोणीही वाली नसल्याने टेंभली पुन्हा पूर्वपदावर आले आहे. ‘आधार’ या मोठय़ा योजनेची सुरूवात टेंभलीपासून झाल्याने भारतभर टेंभलीचे नाव पोहोचले असले तरी गावाला मात्र याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे तुकाराम टिकाराम पवार यांनी हताशपणे सांगितले. रवींद्र माळी या युवकानेदेखील टेंभलीतील समस्यांचा पाढा वाचत आम्हाला किमान रेशन दुकान गावातच देण्याची मागणी केली. लोणखेडय़ास रेशन घेण्यासाठी भाडे खचरून रिक्षाने जावे लागते. रेशन मिळाले तर ठिक नाही तर फेरी वाया जात असल्याचे त्याने सांगितले. आठ वर्षापूर्वी लाखो रुपयांचा निधी खर्च करून टेंभलीत सर्व शासकीय योजना पोहोचल्या होत्या. रस्ते, वीज, पाणी, शाळा, गटारी, रेशन, रॉकेल, सार्वजनिक स्वच्छतागृहे, घरकूल सारेच टेंभलीकरांना मिळाले होते. मात्र शुभारंभ करून डॉ.मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांची पाठ फिरताच शासकीय अधिका:यांनीही टेंभलीकडे पाठ फिरवल्याने 29 सप्टेंबर 2010 चे ते एक सुंदर स्वप्न होते, असे ग्रामस्थांना वाटते.