शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या नगरसेवकाचे पाकीट  मारणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गर्दीत नगरसेवकाचा मोबाईल  व खिशातील रोख रक्कम असा   एकुण 77 हजार 500 रुपयांचा ऐवज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गर्दीत नगरसेवकाचा मोबाईल  व खिशातील रोख रक्कम असा   एकुण 77 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी करणा:या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने पकडले. दरम्यान, पाकीटमार करणारे संशयीत मंगळवारी शहरात निघालेल्या एका रॅलीत येणार असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीचे कर्मचारी शेतक:यांच्या वेशात रॅलीत सहभागी झाले होते.  संदीप सुनील बोरसे (23) रा. पवननगर, खर्दे, ता.शिरपूर व रुपेश वाल्मीक शिरसाठ (19) रा.खर्दे ता.शिरपूर अशी संशयीतांची नावे आहेत.  नंदुरबारचे नगरसेवक गौरव प्रकाश चौधरी हे विजय चौधरी यांच्या रॅलीत मंगळवारी सहभागी झाले होते. गणपती मंदीर चौकात रॅलीत चौधरी यांच्या खिशातील महागडा मोबाईल आणि  रोख रक्कम असे एकुण 77 हजार  500 रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी                  चोरून नेला होता. गौरव चौधरी यांनी लागलीच शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपाूसन बाजाराच्या दिवशी पाकीटमारीच्या घटना वाढल्या होत्या. शिरपूर येथील पाकीटमार असल्याची खात्री एलसीबीला मिळाली होती.  गेल्या मंगळवारी देखील संबधीत पाकीटमार येणार असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. त्यानुसार                 दिवसभर कर्मचारी साध्या वेशात बाजारात फिरत होते. शिवाय बाजाराच्या दिवशीच विजय चौधरी यांची देखील  रॅली असल्याने या रॅलीत पाकीटमार घुसतील ही शक्यता लक्षात घेता एलसीबीच्या कर्मचा:यांनी शेतक:यांचा वेश घेत रॅलीत सहभाग घेतला. याच दरम्यान चोरटय़ांनी नगरसेवक चौधरी यांचे पाकीट मारले. ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी शहरात रेकी सुरू केली. संशयीत शहरातून पळून जावू नये  म्हणून लागलीच विविध ठिकाणे पिंजून काढली. बसस्थानक परिसरातील चहाच्या टपरीवर संशयीत दोघे       आपसात चर्चा करतांना आढळून आले. त्यांना झडप घालून ताब्यात घेतले.  त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची  उत्तरे दिली. पोलीसी हिसका दाखवला असता त्यांनी गौरव चौधरी यांचे पाकीट मारल्याची कबुली दिली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, पोलीस कर्मचारी राकेश मोरे, विजय ढिवरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, विकास पाटील यांनी  केली.