शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

आराळे येथे गटारीच्या बांधकामाच्या वादातून महिला सरंपचाचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:55 IST

किरकोळ वाद : जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी

नंदुरबार : तालुक्यातील आराळे येथे ग्रामपंचायतीने केलेले गटारीचे काम व्यवस्थित नसल्याचे सांगून महिला सरपंचासोबत वाद घालत हात धरुन विनयभंग केल्याची घटना घडली़ याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े आराळे ग्रामपंचायतीने गावातील विविध भागात गटारींच्या बांधकाम केले होत़े  गावातील रघुनाथ गिरासे यांच्या घरासमोरही गटारीचे काम झाले होत़े हे काम निकृष्ट असल्याची तक्रार त्यांनी महिला सरपंचाकडे लावून धरली होती़ यावर उत्तर देताना सरपंचांनी मजूर लावून दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले होत़े यानंतर हा वाद मिटला होता़ मात्र आठ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रघुनाथ गिरासे, कल्पेश रघुनाथ गिरासे, जयपाल रजेसिंग गिरासे, पराग रघुनाथ गिरासे या चौघांनी महिला सरपंचांच्या घरी जाऊन वाद घातला होता़ वाद सुरु असताना कल्पेश गिरासे याने सरपंचांचा हात धरुन ओढाताण करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला़ तसेच इतरांनी जातीवाचक शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश अहिरे करत आहेत़ दरम्यान संशयितांना पोलीसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती देण्यात आली आह़े या घटनेमुळे नंदुरबार तालुक्यातील राजकीय वतरुळात खळबळ उडाली आह़े