शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘जननी सुरक्षे’साठी नंदुरबारातील माता सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:16 IST

सामान्य रुग्णालयाची माहिती : तीन वर्षात 15 हजार 648 लाभाथ्र्यानी घेतला लाभ

नंदुरबार : केंद्र शासनाच्या जननी सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील 15 हजार 648 गरोदर मातांना योजनेचा लाभ मिळाला  आह़े आपल्या बाळाची व स्वताची सुरक्षितता अबाधित रहावी म्हणून अनेक माता योजनेअंतर्गत लाभ घेत असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबारातील दुर्गम भागात अद्यापही जुन्या पध्दतीने घरीच प्रसुती  होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आह़े दुर्गम आदिवासी भागात अनेक गरोदर माता शासकीय रुग्णालयात न जाता घरीत प्रसुत होत असतात़ त्यामुळे बाळासह मातेचाही जीव धोक्यात येत असतो़ असुक्षितता, अज्ञान तसेच जनजागृतीच्या अभावामुळे यातून अनेक बालमृत्यू तसेच माता दगावण्याच्या घटनाही घडत असतात़ त्यामुळे केंद्र शासनाकडून अशा मातांना प्रोत्साहन म्हणून ‘जननी सुरक्षा अभियान’ सुरु करण्यात आले आह़े याअंतर्गत एसटी, एससी तसेच बीपीएल कार्डधारक लाभाथ्र्याना याचा लाभ देण्यात येत असतो़ 2015-2016 अंतर्गत जननी सुरक्षा अभियानाअंतर्गत 3 हजार 854 गरोदर महिलांना लाभ मिळाला होता़ यासाठी 26 लाख 97 हजार 800 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला़ 2016-2017 अंतर्गत 4 हजार 999 गरोदर मातांना योजनेचा लाभ मिळाला़ यासाठी 34 लाख 99 हजार 300 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला़ तर, 2017-2018 मध्ये 5 हजार 795 गरोदर मातांनी योजनेचा लाभ घेतला़ यासाठी 39 लाख 16 हजार 500 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला़ अशा प्रकारे मागील तीन वर्षात 15 हजार 648 लाभाथ्र्यासाठी एकूण 1 कोटी 1 लाख 13 हजार  600 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े गेल्या तीन वर्षाची लाभाथ्र्याची संख्या बघितली असता लाभाथ्र्याच्या संख्येत वर्षागणिक भर पडलेली दिसून येत़े त्यामुळे जास्तीत जास्त माता आता प्रसुत होण्यासाठी शासकीय  रुग्णालयांमध्ये येत असल्याचे यातून स्पष्ट होत आह़े काय आहे अभियान.जननी सुरक्षा अभियान हा पूर्णपणे केंद्र शासनाचा कार्यक्रम आह़े  याअंतर्गत एससी, एसटी तसेच बीपीएल कार्डधारक लाभाथ्र्याना या योजनेचा लाभ घेता येतो़ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित गरोदर माता ही शासकीय रुग्णालयात प्रसुत होणे आवश्यक आह़े प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आदींमध्येच या योजनेचा लाभ मिळू शकतो़ ग्रामीण भागात प्रसुत झालेल्या लाभाथ्र्याला 700 तर शहरी भागातील लाभाथ्र्याना 600 रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर निधीचे वितरण करण्यात येत असत़े त्याच प्रमाणे सिझरियन झालेल्या मातांना 1 हजार 500 रुपयांची मदत करण्यात येत असत़े योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित लाभाथ्र्याना नोंदणी कागदपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक खाते क्रमांक आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असत़े दुर्गम भागात विस्तार व्हावा.दुर्गम भागात अद्यापही बहुतेक मातांची प्रसुती ही घरीच होत़े त्यामुळे सुरक्षिततेअभावी अनेक वेळा बाळ व बाळंतीनीचा जीव धोक्यात येत असतो़ त्यामुळे अशा गरोदर मातांना शासकीय रुग्णालयांच्या दिशेने वळवणे आरोग्य व्यवस्थेपुढे मोठे आव्हान ठरत असत़े त्यामुळे शासनाकडून याबाबत कार्यवाही करत दारिद्रय रेषेखालील तसेच गरिब आदिवासी भागात वास्तव्यास असलेल्या लाभाथ्र्याचा शोध घेण्यात येत असतो़ आशांकडून केली जाते जागृतीआशा कार्यकर्ती तसेच इतर आरोग्य कर्मचा:यांच्या माध्यमातून या अभियानाबाबत दुर्गम भागात जनजागृती केली जात़े लाभाथ्र्याच्या लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात डीबीटीव्दारे वर्ग करण्यात येत असत़े अनेक वेळा लाभाथ्र्याचे बँक खाते नसल्याने त्यांना लाभाची रक्कम मिळण्यास अडचणी निर्माण होत असतात़ दुर्गम भागातील ग्रामस्थांचा दैनंदिन जीवनात बँकेशी फारसा संबंध येत नसल्याने अनेकांची बँक खातीसुध्दा नसल्याच्या अडचणी  अनेक वेळा निर्माण होत असतात़