शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी लागतात रांगा व दुपारी मात्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील सर्वच एटीएम केंद्रांमध्ये दुपारी 12 वाजेर्पयत मोठय़ा प्रमाणावर रांगा लागत आहेत. परंतु दुपारनंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील सर्वच एटीएम केंद्रांमध्ये दुपारी 12 वाजेर्पयत मोठय़ा प्रमाणावर रांगा लागत आहेत. परंतु दुपारनंतर संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी होत असल्यामुळे शुकशुकाट दिसून येत आहे. रविवार वगळता सर्वच ठिकाणी पुरेशी रक्कम राहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रत्येकजण एटीएम वापरतांना काळजी घेत आहे. कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभुमीवर एटीएम केंद्रात देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना सर्व बँकांना यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. तसे निर्देश असलेला सुचना फलक देखील प्रत्येक एटीएम केंद्रात लावण्यात आला आहे.पुरेशी रक्कमशहरातील सर्व एटीएम केंद्रांमध्ये पुरेशी रक्कम राहिल याची खरबदारी घेण्यात येत आहे. जास्तीत जास्त एटीएमचा वापर करून बँकांमधील गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याची खबरदारी सर्व  बँका घेत आहेत. गेल्या शनिवारी व रविवारी काही एटीएममध्ये रक्कम नसल्याने ते बंदच ठेवण्यात आले   होते. परंतु सोमवारपासून पुरेशी  रक्कम प्रत्येक एटीएम केंद्रात राहत आहे.सकाळी गर्दीशहरातील सर्वच एटीएम केंद्राबाहेर दुपारी 12 वाजेर्पयत मोठय़ा प्रमाणावर रांगा दिसून येत आहेत. दुपारी 12 वाजेनंतर संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे दुपारनंतर शुकशुकाट असतो. रात्री काही ठिकाणी तुरळक स्वरूपात गर्दी दिसून येत आहे. सॅनिटायझरची सोयकाही एटीएम केंद्र हे बँकेच्या आवारातच असल्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक सॅनिटायझरची सोय करून देत आहेत. बँक व एटीएममध्ये येणा:या प्रत्येकाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सोय देखील करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची नियुक्तीसध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट असतो. अशा वेळी त्याचा गैरफायदा चोरटय़ांकडून घेतला जावू नये यासाठी सुरक्षा रक्षकांना अलर्ट करण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांचे पेट्रोलिंग करणारे वाहने देखील नियमित एटीएमची तपासणी करीत आहेत. सुरक्षेबाबत सर्वच पातळीवर काळजी घेवून त्यादृष्टीने नियोजन देखील करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.