शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गाढवाद्वारे द्यावा लागला ग्रामस्थांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व एकाचा झालेला मृत्यू यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व एकाचा झालेला मृत्यू यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. परंतु नागरिक काळजी घेण्याबाबत अद्याही दुर्लक्ष करीत आहेत. तोंडाला मास्क लावणे, बाहेर न निघणे याविषयी आव्हान करूनही उपयोग होत नाही. या पाश्र्वभूमीवर ग्रामरक्षक दलाने गाढवालाच मास्क बांधून गावात फिरवून लोकांना अनोखा संदेश दिला.या वेळी नियम मोडणा:या बहाद्दरांना समज देऊनदेखील काही फरक पडत नसल्याने त्यांना अद्दल घडावी यासाठी सारंगखेडा, ता.शहादा येथील स्थानिक प्रशासन व           ग्रामरक्षक दलाच्या युवकांनी आगळावेगळा फंडा तयार केला आहे. या वेळी गावात मोकाट फिरणा:या गाढवांनाच चक्क मास्क बांधल्याने निदान यापासून तरी मुक्या जनावरांचा बोध माणसांनी घ्यावा व त्याचे अनुकरण करावे असेच, यातून संबंधित स्थानिक प्रशासनाला सुचित करावयाचे असावे असाच अर्थ नागरिकांमधून काढण्यात येत आहे.शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी शासनाच्या सूचनांचे पालन करून जनजागृती करीत आहे. या वेळी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवस पूर्णपणे बंद पाळला. तसेच गावातील युवकांचे ग्रामरक्षक दल स्थापन करून गावातील मुख्य रस्ते पूर्णत: बंद             करून बाहेरगावहून येणा:या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.दरम्यान गावातील किराणा दुकान ठरलेल्या वेळेव्यतिरिक्त सुरू राहिल्यास ग्रामपंचायतीकडून संबंधित दुकानदाराकडून दंडही आकारण्यात येत आहे. तसेच काही समजदार नागरिक ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणा:या सूचनांचे पालन करीत असून, काही युवक व ग्रामस्थ त्याकडे दुर्लक्ष करीत गावात फेरफटका मारीत असल्याचे दिसून येत असल्याने ग्रामपंचात प्रशासन व ग्रामरक्षक दलाच्या युवकांनी आगळी वेगळी शक्कल लढवीत गावात जनजागृती करीत आहे. जेणे करून त्याचा बोध तरी संबंधीत नागरिक घेतली, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.