शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई नदीपात्रातील सभा मंडप गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : पुरातन काळातील अप्रितम लेण्यांपैकी दरा फाटय़ानजीक गोमाई नदीच्या पात्रात मध्यभागी असलेल्या पांडव लेण्यांचे दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : पुरातन काळातील अप्रितम लेण्यांपैकी दरा फाटय़ानजीक गोमाई नदीच्या पात्रात मध्यभागी असलेल्या पांडव लेण्यांचे दोन सभा मंडपापैकी एक सभा मंडप नदीला आलेल्या पुरात वाहून गेला.जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे गावे जलमय होऊन नदी-नाल्यांना महापूर आले होते. शहादा तालुक्यातील दरा फाटानजीक गोमाई नदी वाहते. या नदीत खाली उतरले की काही पुरातन शिल्प दिसतात. पाच मूर्ती कोरलेल्या असून हे शिल्प इ.स.1700 शतकाच्या असल्याचे सांगितले जाते. या मूर्ती अखंड काळ्या पाषाणात कोरलेल्या आहेत. ही शिल्प नदीच्या पात्रात आहेत. तिथे  साधारण 15 मीटर अंतरावर दोन वेगवेगळे    सभा मंडप होते. हे सभा मंडप सपाटीपासून 10 ते 12 मीटर खाली नदीच्या पात्रात उभारण्यात आले आहेत. जेव्हा नदीला पाणी नसते तेव्हा ते चांगल्या पद्धतीने बघू पाहता येतात. पहिला सभा मंडप नदीच्या मध्यभागी आहे. त्यात दोन खोल्या बांधल्या असून पहिल्या खोलीत पाच मूर्ती आहेत आणि मुख्य खोलीत भगवान महावीर यांची एक मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या आजूबाजूला ही दोन  मूर्ती आहेत. या मुख्य खोलीत साधारण फक्त दोनच व्यक्ती उभे राहू शकतात पण दुस:या खोलीत अनेक जण उभे राहू शकतात. या दोन्ही सभामंडपांपैकी एक सभा मंडप पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

4परिसरात घरांच्या झालेल्या नुकसानीचे महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात येत आहेत. संततधार आणि भिज पावसाने ग्रामीण भागातील अनेक घराच्या भिंती व घराचे छत पडून  संसार उघडय़ावर आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्वत्र नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात येत आहे. ब्राrाणपुरी येथे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे तलाठी स्मिता पाटील, ग्रामविकास अधिकारी गोपाळ पाटील हे करीत आहेत. यावेळी सरपंच वंदनाबाई मोरे, उपसरपंच माधवराव पहाडा पाटील, पोलीस पाटील रवींद्र पवार, कोतवाल भारत नेवरे, कैलास बिरारे आदी उपस्थित होते.