शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्धा परिसरात मुसळधार

By admin | Updated: June 3, 2017 01:08 IST

दुस:या दिवशीही पाऊस : वीज खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाली

नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात हलका पाऊस झाला, तर शहादा तालुक्यातील परिवर्धासह परिसरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, पत्रे उडाली.जिल्ह्यात पावसाने दुस:या दिवशीही हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या चमचमाटात पाऊस झाला.परिवर्धे परिसरात मुसळधार पाऊसपरिवर्धे, ता.शहादा येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. 15 ते 20 मिनिटे चाललेल्या या पावसामुळे सर्वत्र धावपळ उडाली होती. अनेक दिवसांपासून उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडय़ाफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. वादळी वा:यामुळे आलेल्या पावसाने गावातील अनेक घरांसह झाडांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, दलित वस्तीतील समाज मंदिराचीही पत्रे उडाली असून, गावातील धनराज निकुंभे, दिलीप पानपाटील, ईश्वर गवळे व बाबूलाल मुरार पाटील यांच्या राहत्या घरावरील पत्रे 20 ते 25 फुटांर्पयत उडाल्याने भिंतींचेही नुकसान झाले आहे. तसेच वीज वितरण कंपनीचे पाच खांब कोसळून  वीजपुरवठा खंडित झाला आहे.हळदाणी परिसरात नुकसानहळदाणी, ता.नवापूर येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. या वेळी आंब्याच्या झाडावरील कै:या पडल्याने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच या पावसामुळे परिसरातील शेतीकामांनी वेग घेतला असून, घरांची दुरुस्तीसह गुरांसाठी चा:याची साठवणूक आदी कामांनी वेग घेतला आहे. परिसरात सुरुवातीला वादळी वा:यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाने आगमन केले.