लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरुन दोन लाख रुपये व 10 तोळे सोन्याचे दागिने आणावेत यासाठी दामळदा ता़ शहादा येथील माहेर तर कोरीट ता़ नंदुरबार येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला़ 2013 ते 2019 दरम्यान हा प्रकार झाला़ कविता नितीन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती नितीन प्रल्हाद पाटील, सासरे प्रल्हाद सुपडू पाटील, दीर संदीप पाटील, सासू छायाबाई पाटील सर्व रा़ कोरीट ता़ नंदुरबार यांनी मे 2013 मध्ये विवाह झाल्यापासून कोरीट व अंकलेश्वर येथे छळ करण्यात आला़ याबाबत शहादा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}