शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात एनआरसी विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी तळोदा येथे विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. तेथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी तळोदा येथे विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. तेथे सहभागी नागरिकांमार्फत काळ्या फिती लावून तहसिल कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.तळोदा येथे मुस्लिम युवा मंच, भिलीस्थान टायगर सेना, माकपा, आदिवासी युवा शक्ती, राष्टÑीय मुस्लिम युवा मोर्चा, भिमशक्ती आदी संघटनांमार्फत मार्चा काढण्यात आला. मार्चात मुस्लीम समाजाध्यक्ष आरिफ नुरा शेख, माजी अध्यक्ष हाजी सरदार शेख उमराव, रईस अली अब्बास अली, इमरान अली, लियाकत अली, मोहसिन अजिज मणियार, मुख्तार शाह अब्बास शाह, रफिक भिका मणियार, रफिक हबीब मनियार, मौलाना शोएब रजा नुरी, मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीचे कॉ.जयसिंग माळी, भिलीस्थान टायगर सेनेचे राजू प्रधान, आदिवासी युवा शक्तीचे अरविंद पाडवी, विनोद माळी, राष्टÑीय मुस्लिम मोर्चाचे इमरान शेख आदी सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान मौलाना शोएब रजा नुरी यांनी स्मारक चौकात मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले.मोर्चाला बिरसा मुंडा चौकातून सुरुवात झाली. तेथून मेन रोड, बसस्थानक रोड, स्मारक चौक व हुतात्मा चौक या मार्गावरुन तहसिलपर्यंत नेण्यात आला. कचेरीत पंकज लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात एनआरसी, सीएए यांना संसदेतील विरोधी कक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून विरोध करण्यात आला असतानाही शासनामार्फत कायदा संमत करण्यात आला. त्यापाठोपाठ राज्यसभेत देखील बहुमताच्या जोरावर या कायद्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे कायदा धोक्यात आला पर्यायाने देशातील जनसामान्यांचे जीवनलाही धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.