लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या ट्रूनेट मशिनद्वारे स्वॅब तपासणी करण्यास आयसीएमआरने परवानगी दिली आहे़ या परवानगीनंतर मशिनद्वारे तपासणी केलेले सात स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत़ जिल्ह्यात ट्रूनेट सोबत अँटीजेन ही टेस्टही उपलब्ध झाली असून यातून काही वेळातच कोरोना संसर्ग झाला किंवा नाही याचा निकाल लागत आहे़कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत जिल्हा रुग्णालयात कोविड टेस्टींग लॅब सुरु करण्याची सातत्याने मागणी होत होती़ या मागणीनुसार शासनाने १० दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी ट्रूनेट मशिन मंजूर करुन ते पाठवूनही दिले होते़ सिंधुदुर्ग येथून आलेले मशिन जिल्हा रुग्णालयात लावण्यात आले आहे़ महिला रुग्णालयातील कोविड टेस्टींग लॅबमध्ये हे मशिन ठेवण्यात आले आहे़ या प्रकियेनंतर गेल्या आठवड्यापासून येथे कामकाजाल वेग आला होता़ दरम्यान यानुसार मशिन पुरवठा करणाऱ्या कंपनीने इंजिनियर पाठवून १५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षिण दिले आहे़ कर्मचाºयांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्हा रुग्ण प्रशासनाने आयसीएमआरकडे रुग्णालयात लॅब सुरू करण्याची परवानग मागितली होती़ याकडे जिल्ह्याचे गेल्या आठवड्यापासून लक्ष लागून होते़ दरम्यान सोमवारी आयसीएमआरने ट्रूनेटसोबत अँटीजेन ही रॅपिड टेस्ट करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे़ दोन्ही चाचण्या जिल्हा रुग्णालयातच होणार असल्याने समाधान व्यक्त होत असून अवघ्या काही तासात चाचण्या पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ तूर्तास अँटीजेनमधून टेस्ट सुरू करण्यात आल्या असून ट्रूनेट मशिन बुधवारपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्यता आहे़
सोमवारी आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद) यांनी जिल्हा रुग्णालयाला परवानगी दिल्यानंतर खात्री म्हणून रुग्णालय प्रशासनाने धुळे येथून पॉझिटिव्ह आलेले सात स्वॅब पडताळून पाहिले होते़ त्यांचे रिपोर्ट येथेही पॉझिटिव्ह आले आहेत़ तत्पूर्वी काही रुग्णांची अँटी जेन ही रॅपिड टेस्टही करण्यात आली आहे़ यातून तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे़ अँटी जेन आणि ट्रूनेट अशा दोन्ही सुविधा एकाच वेळी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे़ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्क साखळी शोधण्यासह कंटेन्मेंट झोन तयार करणेही सोपे होणार आहे़
जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेली अँटी जेन ही रॅपिड टेस्ट खात्रीशीरपणे निकाल देत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ एखाद्या रुग्णाची अँटी जेन टेस्ट नेगेटिव्ह आल्यावरही लक्षणे दिसून येत असल्यास दुसऱ्या खात्रीसाठी ट्रूनेटचा वापर केला जाणार आहे़ दरम्यान दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह आल्यावर रुग्णाला तातडीने तसे कळवण्यात येणार आहे़ एकीकडे दोन्ही मशिन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी यात पीसीआर या आणखी एका मशिनची आवश्यकता असल्याची माहिती समोर आली आहे़ दोन्ही मशिनची पडताळणी करण्यासाठी पीसीआर चाचणीसाठी धुळे येथे स्वॅब पाठवावेच लागणार आहेत़