शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

३०० ग्रामपंचायतींवर राहणार महिला राज, आरक्षण सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST

नंदुरबार : पेसा क्षेत्राबाहेरील ७६ तर पेसा क्षेत्रातील ५१९ पैकी त्यातील निम्मे ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात ...

नंदुरबार : पेसा क्षेत्राबाहेरील ७६ तर पेसा क्षेत्रातील ५१९ पैकी त्यातील निम्मे ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात ही सोडत सकाळी झाली. २०२५ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी ही सोडत काढण्यात आली.

जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारुड, निवडणूक उपजिल्हाधिकारी बबन काकडे, अवल कारकून स्वप्नील मुळे, जयप्रकाश पाानपाटील, राहुल निकुंभे उपस्थित होते. युवाक्षी गणेश बोरसे या बालिकेने आरक्षण चिठ्ठी काढली. जिल्ह्यातील पेसा क्षेत्राबाहेरील ७६ पैकी ३८ ग्रामपंचायतींवर महिला राज राहील तर पेसा क्षेत्रातील ५१९ पैकी २६१ ग्रामपंचायतींवर देखील महिला राज राहणार आहे.

सोडत काढतांना विविध गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही सदस्यांनी आरक्षणाबाबत प्रश्न व शंका उपस्थित केल्या. त्याला संबंधित अधिकारी यांनी उत्तर देऊन त्यांचे समाधान केले.

पेसा क्षेत्राबाहेरील ग्रा.पं. सरपंच महिला आरक्षण

n नंदुरबार तालुका : जून मोहिदा-अनु.जाती, न्याहली- अनु.जमाती., नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी अमळथे, कोपर्ली, तिलाली, तलावाडे बुद्रूक, बलदाणे, खोक्राळे. सर्वसाधारण महिलासाठी सातुर्के, ओसर्ली, कानळदे, कार्ली, निंभेल, बलवंड, बह्याणे, सैताणे, कलमाडी, भालेर, रनाळे, खोंडामळी, तलवाडे खुर्द, आसाणे.

n शहादा तालुका : टेंभे त.श.-अनु.जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ससदे, दोंदवाडे, नांदरखेडा, शिरूड दिगर, पुरुषोत्तमनगर. सर्वसाधारण महिलांसाठी कानडी त.श., खैरवे/भडगाव, टेंभे त.सा., तोरखेडा, कोठली त.सा., मनरद, मोहिदे त.श., लांबोळा, वरुळ त.श. वर्ढे त.श., हिंगणी. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

पेसा क्षेत्रातील ग्रा.पं. सरपंच महिला आरक्षण

n नंदुरबार तालुका : शिवपूर, पिंप्री, गुजरभवाली, वाघाळे, टोकरतळे, उमज, खोडसगाव, सुतारे, नटावद, बालआमराई, पातोंडा, धानोरा, लोय, व्याहूर, गंगापूर, बिलाडी, अजयपूर, शेजवे, लहान शहादा, मालपूर, चाकळे, खामगाव, दहिंदुले खुर्द, भोणे, उमर्देखुर्द, जळखे, करणखेडा, आडछी, गुजरजांभोली, पावला, पळाशी, पाचोराबारी, वडझाकण, धुळवद, भांगडा, नारायणपूर, धीरजगाव, दुधाळे, आर्डीतारा, वाघशेपा, वाघोदा, भवानीपाडा, वरुळ, नळवेखुर्द, ढेकवद, वेळावद, करजकुपे, देवपूर.

n शहादा तालुका : भूतेआकसपूर, ईस्लामपूर, कन्साई, नांदे, प्रकाशा, परिवर्धे, पिंप्राणी, फत्तेपूर, चांदसैली, डोंगरगाव, तिखोरे, धांद्रेबुद्रूक, बिलाडी, भादे, मुबारकपूर, मंदाणे, रामपूर, वडगाव, वडाळी, सुलवाडे, सावखेडा, अलखेड, चिरडे, जवखेडा, काकर्दे बुद्रूक, गणोर, चिरखान, ओझर्टे, कवठळ त.श., वैजाली, रायखेड, पिंपळोद, कवळीद, भागापूर, कुरंगी, वाघोदे, शहाणा, जाम, नांदर्डे, असलोद, जावदे त.बो., लोणखेडा, जुनवणे, लोंढरे, गोदीपूर, लंगडीभवानी, पिपंर्डे, खरगोन, दामळदा, टवळाई, बोराळे, कहाटूळ, काथर्दे दिगर, करणखेडा, वडछील, काकर्दे खुर्द, नागझिरी, धुरखेडा.

n नवापूर तालुका : घोडजामणे, नागझरी, लक्कडकोट, खेकडा, रायपूर, चौकी, बोकळझर, आमलान, वावडी, कोकणीपाडा, भांगरपाडा, सावरट, बोरपाडा, विसरवाडी, बंधारपाडा, खडकी, कडवान, शिरवे, चोरविहीर, वडफळी, तारापूर, भादवड, घोगळपाडा, झामट्यावड, बिजगाव, शेगवे, निजामपूर, करंजाळी, सोनपाडा, जामतलाव, देवमोगरा, शेही, बंधारफळी, बिलमांजरे, वडदे बुद्रूक, खानापूर, वडखुट, खातगाव, चिखली, नानगीपाडा, नावली, वाटवी, बिलबारा, हळदाणी, चितवी, भरडू, पाटीबेडकी, वागदी, कोठडा, उकाळापाणी, केळी, धुळीपाडा, नगारे, भवरे, मेंदीपाडा, लहान कडवान, चेडापाडा.

n तळोदा तालुका : राणीपूर, करडे, छोटाधनपूर, पिंपरपाडा, खुशगव्हाण, बुधावली, अमोणी, राजविहीर, अमलपाडा, दसवड, आमलाण, दलेलपूर, प्रतापपूर, बोरद, चिनोदा, सोमावल खुर्द, वाल्हेरी, धानोरे, सोमावल बुद्रूक, राणापूर, नवागाव, तुळाजे सिंगसपूर, लाखापूर फॅारेस्ट, कढेल, मोड, रोझवे, चौगाव खुर्द, रापापूर, खडी बुद्रूक, धवळीविहीर, बेलीपाडा, सिलिंगपूर, खडीखुर्द, जीवनगर.

n अक्कलकुवा तालुका : पिंपळखुटा, साकलीउमर, मणिबेली, ढेब्रामाळ, पोरांबी, भाबलपूर, होराफळी, गंगापूर, सिंगपूर बुद्रूक, काकडखुट, मोग्रा, मोलगी, कुकडीपादर, वाण्याविहीर, राजमोही, ब्राम्हणगाव, वेली, कडवामहू, बिजरीगव्हाण, सोरापाडा, मोरंबा, तालंबा, अलीविहीर, सिंदूरी, कौली, सोनापाटी, ब्रिटिश अंकुशविहीर, वालंबा, खडकापाणी, हुनाखांब, सरी, सल्लीबार, अंबाबारी, कंकाळामाळ, खडकुना, मंडारा, टावली, बोखाडी, देवमोगरा.

n धडगाव तालुका : चोंदवाडे बुद्रूक, बिजरी, सिसा, मुंदलवड, तलाई, गेंदामाळ, छापरी, तोरणमाळ, मांडवी, धनाजे बुद्रूक, गोरंबा, रोषमाळ खुर्द, राडीकलम, सोनबुद्रूक, नंदलवड, खांडबारा, पालखा, चुलवड, पाडली, काकरापाटी, मोख बुद्रूक, उमराणी बुद्रूक, काकडदा, पाडामुंड, कुंडल.