शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोदीपूर येथे प्रेमीयुगलाचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी :   शहादा तालुक्यातील गोदीपुर शिवारातील शेतात प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी :   शहादा तालुक्यातील गोदीपुर शिवारातील शेतात प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारपासून हे प्रेमीयुगल शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथून बेपत्ता होते. आज दोघांचे मृतदेह शेतात आढळून आले. शहादा तालुक्यातील गोदीपुर शिवारातील संजय नरोत्तम पाटील यांच्या केळीच्या शेताच्या बांधावर निंबाच्या झाडाला साडीच्या साहाय्याने युवक व युवतीने गळफास घेतलेली दिसून आले. घटनेची माहिती संबंधित शेतमालकाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती गोदीपुर येथील पोलीस पाटील प्रविण पाडवी यांना दिली. त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. घटनास्थळी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एम.रमेश, पोलीस उपनिरीक्षक एम.डी. नाईक, हवालदार मेहरसिंग वळवी, ब्राह्मणपुरी बिटाचे धिरसिंग वळवी, अजय गांगुर्डे, लोमटे, अनिल पावरा दाखल झाले. गळफास घेतलेल्या युवकाचा खिश्यात मोबाईल तसेच जवळ मोटार सायकल क्रमांक (एम.एच.१८ बी.एफ.६५६९) उभी आढळून आल्याने पोलीसांनी तपास चक्रे फिरवत संबंधित युवक व महिला कुठली याचा तपास केला असता शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील लक्ष्मी अशोक मोरे (३०) वर्षीय विवाहित महिला तसेच  सागर दयाराम फुले रा.वाडी खु. ता.शिरपूर (२५ ) हे दोघेही बेपत्ता असल्याचे कळले. या तरुणाविरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवार पासून दोघेही फरार झाले होते. त्यामुळे महिलेच्या पतीने  शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर शहादा तालुक्यातील गोदिपूर शिवारात या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.  शिरपूर तालुक्यातुन गोदिपूर येथे आले कसे...?प्रेमयुगल हे शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील असून हे शहादा तालुक्यातील नवेगोदीपुर येथे नातेवाईकांकडे आले असल्याची माहिती मिळाली परंतु नातेवाईक हे परराज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेले असल्याने हे प्रेमीयुगलाने गोदीपुर शिवारातील शेतात येऊन गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.