शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसमुळे एसटी महामंडळाला लाखोंचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र एसटी वकर्स काँग्रेसतर्फे (इंटक) शहरात कामगार मेळावा व सेवानिवृत्ताच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र एसटी वकर्स काँग्रेसतर्फे (इंटक) शहरात कामगार मेळावा व सेवानिवृत्ताच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होत़े मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार जयप्रकाश छाजेड होत़े  कार्यक्रमात बोलताना माजी आमदार छाजेड यांनी राज्य शासनाकडून एसटी महामंडळ विकण्याचा प्रयत्न होत असून शिवशाही बसमुळे एसटीला लाखो रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप करुन एसटी महामंडळाची सद्यस्थिती मांडली़ कार्यक्रमास आमदार चंद्रकांत रघुवंशी, संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे, संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख मायाजी डोळस, संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रविण शिसोदे, धुळे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे, सचिव  चंद्रकांत गोसावी, विभागीय उपाध्यक्ष एम़पी़देसले, रविंद्र बैरागी, रविंद्र पाटील, संजय पाटील, विकास गवळी, अनिल पाटील, एस़क़ेठाकरे, सी़जी़शिंपी, दिनेश नेरकर, शुभांगी शिंपी, भरत कोळी आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत़े कार्यक्रमात बोलताना छाजेड यांनी सांगितले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एसटी महामंडळाचा खेळखंडोबा करत आहेत़ एसटीची माहिती नसणारे निवृत्त अधिकारी आणून बसवत स्वत:चा फायदा करुन घेत आहेत़ कर्मचा:यांनी संप पुकारल्यानंतर एसटीची स्थिती चांगली नसल्याचे सांगणा:या महामंडळाने 1 हजार शिवशाही बसेसचा ठेका खाजगी कंपनीला दिला होता़ त्या ठेकेदाराची बँकेची पत नसल्याने त्या गाडय़ा बँकेने ओढून नेल्या होत्या़ आता पुन्हा नव्याने 400 गाडय़ांचा ठेका परिवहन मंत्र्यांनी दिला आह़े रावते यांच्या कार्यकाळात एसटीत सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला असून 50 कोटी रुपयांचे स्वच्छता कंत्राट त्यांनी 507 कोटींना दिला असल्याचा खळबळजनक आरोपही माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केला़ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एसटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितल़े प्रास्ताविक चंद्रकांत गोसावी यांनी केल़े सूत्रसंचालन चेतना पाटील यांनी तर आभार एम़एऩआगळे यांनी मानल़े 

कार्यक्रमात धुळे विभागातील 24 सेवानिवृत्त कर्मचा:यांचा गौरव करण्यात आला़ यावेळी त्यांचे कुटूंबियही उपस्थित होत़े दरम्यान भाषणात आमदार छाजेड यांनी शिवशाही बसेसच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली असून खाजगी ठेकेदाराच्या माणसांमुळे एसटीची पत खाली गेल्याचे सांगितल्यानंतर उपस्थित कर्मचा:यांनी घोषणा देत ठेकेदाराचा निषेध केला़