शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नगर भूमापन कार्यालयाला ताळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : येथील नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकारी रजेवर असल्यामुळे कार्यालयास ताळे लागले असून, त्यांच्याकडून मिळणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकारी रजेवर असल्यामुळे कार्यालयास ताळे लागले असून, त्यांच्याकडून मिळणारे प्रॉपर्टी कार्ड व नकाशांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. एवढेच नव्हे याअभावी दुय्यम निबंधक कार्यातील काही कामेही प्रभावित झाल्याचे नागरिक सांगतात. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तातडीने पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. तळोदा येथील नगर भूमापन कार्यातील संबंधित अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून कार्यालयासदेखील ताळे लावण्यात आले आहे. परिणामी नागरिकांची तेथील कामे सुद्धा ठप्प झाले आहेत. विशेषत: नागरिकांना येथून त्यांचे मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड, नकाशे यासारखे महत्त्वाची दस्तऐवज मिळत नाही. त्यांच्या शिवाय दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रेशन अभावी गहाण खत, खरेदीखत, हक्क सोड होत नाही. त्याकरिता शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक दररोज कार्यालयाकडे सारखे हेलपाटे मारत आहेत. यात त्यांचा वेळ, पैसा वाया जात आहे. तरीही कामे होत नसल्याने निराश होऊन परतावे लागत असल्याची व्यथा काहींनी बोलून दाखवली आहे. वास्तविक हे महत्त्वाचे दस्तावेज असल्यामुळे  दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रेशनची कामेही प्रभावित झाल्याचे नागरिक म्हणतात. याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास विचारले असता. त्या कर्मचारीने रजेचा अर्ज दिला आहे. अजून रजा मंजूर करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर त्यांची ग्रामपंचायत निवडणूक कमी महसूल प्रशासनाने नियुक्ती केली आहे, असे असले तरी लवकरच  पर्यायी कर्मचारी देण्यात  येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचे होत असलेले हाल  लक्षात घेऊन तत्काळ पर्यायी कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भूमिलेख कार्यालयही प्रभारीवर                   येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन भूमिलेख अधीक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय प्रभारीवर चालू आहे. कारण नंदुरबार कार्यालयातील अधिकारींकडे अतिरिक्त चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच ते दोघं कार्यालयास पुरेसा न्याय देऊ शकत नाही. परिणामी कामेदेखील वेळेवर पूर्ण होत नसल्याच्या नागरिकांचा आरोप आहे. आधीच महत्त्वाच्या दस्तऐवजवर त्यांची स्वाक्षरी शिवाय पुढे सरकत नाही. शेतकरी वर्गास बँकेच्या कर्जाकरिता बोजा चढविण्याकरिताही फीर फीर करावी लागत आहे. निदान शासनाने नागरिकांच्या मालमत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सदर नवीन, नियमित अधिकारीच नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे.

भूमिलेख कार्यालयही प्रभारीवर येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन भूमिलेख अधीक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय प्रभारीवर चालू आहे. कारण