शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वीज कंपनीकडून केवळ मान्सूनपूर्व दुरुस्तीच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात विविध विभाग कमीतकमी कर्मचारी बोलावून यांत्रिकी दुरुस्त्या करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात विविध विभाग कमीतकमी कर्मचारी बोलावून यांत्रिकी दुरुस्त्या करुन घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत़ या वीज वितरण कंपनीने केवळ मान्सून पूर्वी होणाऱ्या दुरुस्तीच्या कामांनाच प्राधान्य दिले असून लॉकडाऊनमध्ये वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील आहेत़जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागात एकूण ३०२ फिडर आहेत़ या फिडरवरुन जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार अशा दोन विभागात १२० मेगाव्हॅट वीज दर दिवशी नियमित देण्यात येते़ सध्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, मोठ्या कंपन्या आणि किरकोळ दुकाने बंद असल्याने वीजेचा तुटवडा कमी झाला आहे़ यातून जिल्ह्यातील सर्वच भागात २४ तास अखंड वीज पुरवठा सुरु आहे़कंपनीकडून लॉकडाऊन काळात दुरुस्तीची कामे करण्यात येण्याची शक्यता होती़ परंतू जास्त कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असल्याने दुरुस्तीची कामे थांबवण्यात आली आहे़ तरीही दुसरीकडे शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे़ नवापुर तालुक्यातून याची सुरुवात करण्यात आली असून झाडांची छाटणी, तारांची दुरुस्ती, वाकलेले खांब सरळ करणे तसेच ट्रान्सफार्मर्सचा आढावा घेण्याचे कामकाज होत आहे़याबाबत अधिक्षक अभियंता आऱएम़ चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, शहरी आणि ग्रामीण भागात वेळोवेळी दुरुस्तीची कामे होतील़ मोठी दुरुस्ती लॉकडाऊननंतर करण्यात येतील़ जिल्हा रुग्णालय तसेच निर्माण करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्ड आणि क्वारंटाईन कक्षांमध्ये नियमित २४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे़ तेथील वीज बंदच होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे़ पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्त्यांसाठी कमीत कमी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे़दरम्यान जिल्ह्यात ७० छोटे-मोठे उद्योग आहेत़ यातील तीन साखर कारखाने आधीच बंद झाले होते़ उर्वरित मोठ्या उद्योगही बंद असल्याने औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणारी वीज पूर्णपणे वाचली असल्याची माहिती देण्यात आली आहे़