शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे स्वच्छ वातावरणात पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग थांबत असल्याचा चांगला निष्कर्ष समोर आला असताना दुसरीकडे पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनासह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग थांबत असल्याचा चांगला निष्कर्ष समोर आला असताना दुसरीकडे पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनासह शारिरिक क्षमतांवर चांगले परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आह़े याचा पुरावा म्हणजे नंदुरबार शहरात पॉलेटेकिAक कॉलेजमध्ये घुबडाच्या पाच अंडय़ांमधून पाच पिले बाहेर आले असून सर्वाची प्रकृती ही उत्तम आह़े होळतर्फे हवेली शिवारातील पॉलिटेकिAक कॉलेजमध्ये पाच घुबड अंडय़ातून बाहेर आल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आली होती़ त्यांनी सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे यांच्यासह पथकाने तातडीने याठिकाणी भेट देत महाविद्यालयाच्या एका खोलीत असलेल्या पाचही पिंलांना ताब्यात घेतले होत़े तपकिरी रंगाच्या या पाचही घुबडांची प्रकृती चांगली असल्याचे यावेळी दिसून आल़े यावेळी वनविभागाचे अलर्ट फाउंडेशनचे आकाश जैन हेही होत़े त्यांनी घुबडांची पाहणी केली होती़ दरम्यान पाचही पक्ष्यांना वनविभागाच्या कार्यालयात आणून तेथे पशुवैद्यकीय अधिका:यांकडून तपासणी करुन घेण्यात आली़ या पक्षांना सध्या ठाणेपाडा ता़ नंदुरबार येथील रोपवाटिकेत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्याठिकाणी अन्न व पाण्याचा पुरवठा करण्यात येत आह़े पिंगळा वंशातील घुबड अनेक समज आणि गैरसमजांचा धनी आह़े यातून या पक्ष्यांचे अस्तित्त्व गेल्या काही वर्षात धोक्यात आले आह़े नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मादी घुबड अंडी देत़े पांढ:या रंगाच्या या अंडय़ांमधून बाहेर येणारे पक्षी किमान 11 महिन्यात पूर्णपणे मोठे होतात़ सध्या वाचवण्यात आलेले पाचही पक्षी अडीच महिन्यांचे आहेत़ पूर्णक्षमतेने वाढ झाल्यावर त्यांची उंची 21 सेंटीमीटर्पयत वाढू शकत़े वातावरणातील पोषक बदलांमुळे पाचही पक्षी अडीच महिने सुस्थितीत राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े घुबडाचा प्रजनन दरच कमी असल्याने सध्या वातावरणातील स्वच्छ आणि कमी झालेला डिस्र्टबन्स अर्थात ध्वनी आणि इतर बाबींचा व्यत्यय यामुळे हे पक्षी चांगल्या क्षमतेने वाढले असावेत असा वनविभागाचा अंदाज आह़े प्रजनन क्षमतेबाबत वनविभागाने केलेला दावा फोल नसल्याची अनेक कारणे सध्या जिल्ह्यातील विविध भागातून समोर येत आह़े यात प्रामुख्याने पक्ष्यांचा संचार वाढणे, नागरिकांच्या पडीक घरे आणि शेतांच्या जागेत अंडी मिळणे तसेच पिंले दिसून येत असल्याची माहिती आह़े वनविभागाने लॉकडाऊन काळात नागरिकांच्या माहितीवरुन तब्बल 11 मांडूळ जातीचे सर्प जप्त करुन जंगलात सोडून दिले आहेत़ पक्ष्यांचीही माहिती दिल्यानंतर तेथे पथक पोहोचून बचाव कार्य करत आहेत़