शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

खेडदिगरला कोब्रा जातीच्या दोन सापांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:08 IST

म्हसावद : खेडदिगर ता.शहादा येथून मध्यप्रदेशातील गारूडीकडून अवैधरित्या कोंबून ठेवलेले दोन कोब्रा जातीचे साप शहाद्याच्या सर्पमित्रांनी ताब्यत घेत शहादा ...

म्हसावद : खेडदिगर ता.शहादा येथून मध्यप्रदेशातील गारूडीकडून अवैधरित्या कोंबून ठेवलेले दोन कोब्रा जातीचे साप शहाद्याच्या सर्पमित्रांनी ताब्यत घेत शहादा वनविभागाच्या हवाली केल़े दरम्यान दोन्ही गारूडी अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती आह़े या दोन्ही गारुडींचा शोध घेण्यासाठी शहादा वनविभागाने दोन पथके तयार केली असून मध्यप्रदेशात त्यांचा शोध घेतला जाणार आह़े 10 दिवसापासून दोन गारूडी खेडदिगर ता.शहादा भागात सापांचा खेळ करत असल्याची माहिती सर्पमित्र  भिमसेन रावताळे यांना मिळाली होती़ त्यांनी तपास केला असता फुलसिंग आणि बबलू दोन्ही रा.पलसूद ता.राजपूर,जि.बडवाणी (मध्यप्रदेश) नामक व्यक्ती खेडदिगर परिसरात घरात साप असेल तर  काढण्यासाठी एक हजार रुपए वसूल करतात नाहीतर घरात साप सोडून देण्याची धमकी देत असल्याची माहीती मिळाली होती़ दोघांकडे 5 ते 6  कोब्रा साप असून ते खेळ असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले होत़े यानुसार सर्पमित्रांनी वनविभागाला माहिती दिली होती़ दरम्यान मंगळवारी रात्री  शहादा येथील सर्पमित्र  सागर निकुंभे,भिमसेन रावताळे, दिपक मोरे, महेश पवार,राहूल कोळी, स्वप्निल इंगळे,रूपेश कोळी, यांचेसह लोणखेडा येथील अमोल जमादार, संदीप माळी,जयेंद्र राजपूत यांनी खेडदिगर येथे दोघा गारुडींच्या मुक्कामस्थळी छापा टाकला होता़ यात दोघे पळून गेल्यानंतर तेथून 2 नाग हस्तगत करण्यात आल़े दोन्ही नाग वनविभागाकडे सोपवण्यात आल़े उपवनसंरक्षक एस.बी.केवटे, सहाय्यक  वनसंरक्षक एस.आर.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली असून  मध्यप्रदेशात रवाना करणार असल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल पवार यांनी दिली़ साप भारतीय वनअधिनियम कायदा 1972 शेड्यूल 2 मध्ये येत असून संरक्षीत असल्याचे सांगीतले.