शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी जीवन जगा-खगेंद्र महाराज शहादेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:49 IST

अध्यात्म

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आनंद ही प्रसन्नतेच्या पुढची अवस्था आहे. अत्यानंदाला व्यक्त करताना अंत:करणाची गरज असते. मानवी जीवनात चार गोष्टी अशा आहेत की त्या कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपवता येत नाही. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे अहंकार. आपल्यात अहंकार नाही याचा कितीही भास निर्माण केला तरी वाणी आणि वर्तनातून तो कधी व्यक्त होतो ते कळत नाही. दुसरी आतुरता ! एखाद्या व्यक्तीच्या भेटीची आतुरता असेल तर तुम्ही कितीही गर्दीत असा पण येणाऱ्या व्यक्तीची वाट पाहण्याची क्रिया तन व मन लपवू शकत नाही. साºया गोपीकांमध्ये असणारी राधा भगवान श्रीकृष्णाची वाट पाहत होती. तिची आतुरता सर्वांच्या लक्षात येत होती. मुलीने फोन केला आई मी उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत येते तर दुसºया दिवशी सकाळी उठल्यापासून त्या आईजवळ कितीही महिला बसल्या असतील पण मुलीच्या येण्याची आतुरता काही वेगळीच असते. तिसरी गोष्ट म्हणजे अज्ञान! विद्वानांच्या सभेत अज्ञानी ओळखला जातो. ‘‘प्राप्नोतू वसंत समये काक: काक: पिक: पिक:’’ कोकीळेच्या सभेत एखादा कावळा असेल तो रंगाने झाकला जाईल पण जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा कोकीळेचा आवाज कावळा काढू शकत नाही. तसे अज्ञान लपवता येत नाही. चौथी गोष्ट म्हणजे आनंद! एका राजाचे एक फर्मान काढले- उद्या संगीताची मैफील आहे, सर्वांनी श्रवणाला या. परंतु गायकाला दाद देऊन जो मान हलवेल त्याची मान कापली जाईल. दुसºया दिवशी आयोजन केले, खूप लोक आले. मैफील प्रारंभ झाली गाणे खूप रंगात आले गायकाने आलाप घेतला. पुढच्या क्रमांकावर एक संगीतप्रेमी बसला होता. त्याने अशी दाद दिली, तो इतका आनंदीत झाला, सर्व विसरला व व्वा व्वा करीत मान हलवली, आनंद लपवू शकला नाही. अनुवाण, अनुशोष, आर्तता हे आनंदातील अवरोध आहेत. अनुवाण म्हणजे वर्तमानातील दु:ख, हे आनंद घेऊ देत नाही. अनुशोष म्हणजे भविष्यातील दु:ख व आर्त म्हणजे भेटीचे दु:ख. ग्रंथात आनंदाचे अनेक प्रकार आहेत. श्रीमद् भागवतात पाच आनंद मुख्य आहेत. १) सच्चिदानंद २) परमानंद ३) प्रेमानंद ४) ब्रह्मानंद ५) आत्मानंद. म्हणून अखंडानंद सरस्वती महाराज भागवताला पंचानंद व पंचामृत असेही म्हणायचे सार एकच आहे. संन्याशी, पंडित, ज्ञानी, प्रपंची, सज्जन किंवा दुर्जन प्रत्येक व्यक्ती जीवनात आनंदाचीच अपेक्षा करतो.सतत आनंदी रहा, हसते रहो, नाचते रहो...-खगेंद्र महाराज शहादेकरभागवतकार, शहादा