शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

चला, २०२१ चे लक्ष गाठूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:31 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मावळते २०२० हे वर्ष अनेक अर्थाने आठवणीचे ठरणार आहे. या आठवणी बहुतांश ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मावळते २०२० हे वर्ष अनेक अर्थाने आठवणीचे ठरणार आहे. या आठवणी बहुतांश कटू असल्या तरी हे वर्ष सर्वांनाच खूप काही शिकवून गेले. हीच शिकवण घेत नव्या २०२१ या वर्षात नवा संकल्प, नवीन लक्षांक आणि नवे उद्दीष्ट ठरवून काम करण्याची गरज आहे. विशेषत: सरत्या वर्षात कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे जी बंधने आली होती त्यामुळे विकासाची गती निश्चितच मंदावली. पण आता कोरोनासोबत जगण्याचा मंत्र सर्वांनीच स्विकारला आहे. त्यामुळे नव्या वर्षात कामाची गती अधीक वेगाने हाकू या.नंंदुरबार जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषीत केला आहे. या जिल्ह्याला इतर प्रगत जिल्ह्याच्या बरोबरीने विकासाचे उद्दीष्ट साधण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्याला दोन वर्ष झाले आहेत. पहिले वर्ष हे उपक्रम राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. पण दुसरे वर्ष मात्र पुर्णपणे थांबले. या वर्षात आकांक्षीत जिल्ह्याचे उपक्रम राबविणे शक्य झाले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षात त्याला गती द्यावी लागणार आहे. कुपोषणाचा प्रश्न कोरोना काळात गंभीर झाला. लसीकरण करणे, अंगणवाडीतील पोषण आहार, बाळांची नियमित आरोग्य तपासणी यात निश्चितच मर्यादा आल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढले. मध्यंतरीच्या काळात हा विषय गंभीर बनला होता. आता हळूहळू त्यावर नियंत्रण येत असले तरी या कार्यक्रमात अधीक गती देण्यासाठी नवीन वर्षात आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासन या सर्वांनाच समन्वयातून प्रभावीपणे काम करावे लागणार आहे. रोहयोचे कामे सरत्या वर्षात मोठ्या प्रमाणावर झाली. या काळात मजुरांचा उपस्थित संख्येचाही  विक्रम झाला. पण त्यात सातत्य राखता आले नाही. अखेर रोहयोच्या कामावरील मजुर स्थलांतरीत झालेच. हे स्थलांतर रोखण्यासाठीही अधीक जोमाने काम करावे लागणार आहे.सरत्या वर्षात विकासाचे जे प्रश्न रखडले होते ते कायम आहेत. रस्त्यांचे प्रश्न असो, सिंचनाचा प्रश्न असो, शेतीचे प्रश्न असो की इतर भौतिक विकासाचे प्रश्न सर्वच प्रश्न आहे तसेच आहेत. तापीवरील उपसा योजनांचा प्रश्न पुढे सरकू शकला नाही. औद्योेगिक वसाहतींचा प्रश्न तर ठप्पच पडला आहे. तापी-बुराई योजनेचे काम थांबले आहे. दरा प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाचा प्रश्न कायम आहे. अंबाबारी प्रकल्पाचे कामही गेल्या वर्षी थांबले असे कित्येक विकासाच्या प्रश्नांना चालना मिळाली नाही. जिल्हा नियोजनाचा वार्षिक निधीही केवळ ३० टक्केच मिळाला. त्यामुळे विकासाच्या कामांना प्राधान्यही देता आले नाही.नवीन वर्षाची सुरुवात करताना गेल्या वर्षी थांबलेल्या प्रगतीचा लक्षांक यावर्षी कसा भरून काढता येईल यासाठीही प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक संघटना आणि जनता यांनी हातात हात घालून संघटीतपणे काम करण्याची गरज आहे. नवीन वर्षात सर्वांना हीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करू या...