शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ येथे दरीत वाहन कोसळल्याने भीषण अपघात, आठ जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 19:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी ता. शहादा  : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्‍या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी ता. शहादा  : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्‍या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खाजगी क्रुजर गाडी सुमारे ४००  फूट दरीत कोसळुन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून १० पेक्षा अधिक  प्रवासी जखमी झाल्याची माहीत आहे.    रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.  तोरणमाळ येथून  खडकी- सिंदिदीगर मार्गाने सातपुड्याच्या दुर्गम भागातील घाटरस्त्यांवरुन मध्यप्रदेशातील सेम्लेट, चेरवी ता.पाटी जि.बडवानी येथे हे प्रवासी वाहन जात होते. प्रवाशांना घेवून जाणारे हे वाहन पाऊस आणि दाट धुके यामुळे दरीत कोसळल्याची माहिती आहे. धुक्यामुळे चालकाला समोरील दृश्य न दिसल्याने घाटातून वाहन थेट ४०० फूट खोल दरीत कोसळल्यानंतर आती आठ जण जागी ठार झाले. दरीत जागोजागी वाहनाचे अवशेष तसेच मृतदेह पडून असल्याचे दिसून येत आहे.  जानेवारी महिन्यात तोरणमाळ ते खडकी दरम्यान असाच भीषण अपघात झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या या अपघाताने या भागातील वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान सातपुड्याच्या अती दुर्गम भागात हा अपघात घडला असून याठिकाणी पोहोचण्यासाठी पोलीस दल तसेच महसूल विभागाच्या अधिका-यांना अडचणी येत आहेत. तोरणमाळ व सिंदीदिगर परिसरातील नागरीकांनी बचाव कार्य सुरु केले असून म्हसावद पोलीस ठाण्याचे व तोरणमाळ औटपोस्टचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्याची माहिती आहे.  सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर आणि खडतर असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य करीत असुन जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  याठिकाणी नेटवर्क नसल्याने अधिक माहिती मिळण्यात अडसर निर्माण होत आहे.