शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेडा धरणाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : तालुक्यातील खापरखेडा लघु प्रकल्प धरणातील विहीर व गेट दुरुस्ती करून गाळ काढण्यात     ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : तालुक्यातील खापरखेडा लघु प्रकल्प धरणातील विहीर व गेट दुरुस्ती करून गाळ काढण्यात      यावा, यासाठी शिवकृपा पाणीवाटप संस्थेने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, खा. डाॅ. हीना गावित व आ. डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन सादर केले.शहादा तालुक्यातील महत्त्वाचा लघु प्रकल्प असलेल्या खापरखेडा धरणातील गाळ काढून विहीर व गेट दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवकृपा पाणीवाटप संस्था व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या निवेदनात परिसरातील शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या खापरखेडा येथील लघु प्रकल्पाची निर्मिती १९७० ते १९७२ च्या काळात झाली. या प्रकल्पातून परिसरातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पातून कोंढावळ, जयनगर, वडाळी या गावातील शेतकऱ्यांना लाभ झाला. मात्र, अनेक वर्षांपासून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून त्याचा परिणाम पाणी साठवणुकीवर झाला. यामुळे ६०० हेक्टर क्षेत्रापैकी फक्त १५० ते २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होत आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळीही खालावली जाते. गेल्या तीन वर्षांपासून मुख्य कूपनलिका गाळामुळे बंद आहे. म्हणून शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी पाणीपुरवठा होत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शिवकृपा पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी, शेतकरी राकेश हिरामण देवरे, लक्ष्मण माळी, निंबा काशिनाथ वैराळे, निखिल लालचंद माळी, सुरेश बुधा माळी, हिरामण विठ्ठल माळी आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.खा. डॉ. हीना गावित आज धरणाची पाहणी करणारकोंढावळ, जयनगर, वडाळी परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी ठरणाऱ्या कोंढावळ येथील धरणाच्या दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन खा.डॉ.हीना गावित यांना दिले होते. त्यांनी तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष धरणाची पाहणी करण्यासाठी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी खा.डॉ.हीना गावित व आ. डॉ.विजयकुमार गावित भेट देणार असल्याची माहिती शिवकृपा पाणी वाटप संस्थेतर्फे देण्यात आली.

भूकंपाच्या धक्क्यामुळे धरण झाले खाली२ जानेवारी रोजी कोंढावळसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे १५ दिवसांतच धरणात पाण्याचा जो साठा होता तो नदीत पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे संपूर्ण धरण कोरडे पडले आहे. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांचा रबी हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन हवालदिल झाला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदित होते. मात्र, धरणाला गळती लागल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.