शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक जाणिवेतून ग्रामज्ञान केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक मोठा फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. प्राथमिक व माध्यामिक वर्गात जाणा-या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवण्याची भिती असल्याने याठिकाणी आता   गावो गावचे शिक्षित विद्यार्थी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून सोन बुद्रुक ता. धडगाव येथे ग्रामज्ञान केंद्र सुरु करण्यात आले  आहे. सोन बुद्रूक या गावात सुशिक्षित युवकांनी एकत्र येऊन विद्यार्थांसाठी वर्ग चालू करण्याचे ठरवले आणि हे प्रत्यक्षात देखील उतरवलं. त्यास ग्रामज्ञान केंद्र असे नांव दिलं आणि  पहिली ते पदवीपर्यंतचे वर्ग सुरू केले. गेल्या १ जूलैपासून ते अद्यापपर्यंत या ग्रामज्ञान केंद्रांत गावातील  पहिली ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. गावातील तरुणाईने एकत्र येत हा उपक्रम सुरु केला आहे. आपल्या भाऊ-बहिणीचे  कोरोनामुळे बंद असलेल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा विपरित परिणाम होऊ नये तसेच सुरू असलेल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी गावातील ग्रामज्ञान केंद्राने खूप प्रयत्न केल्याचे येथील युवकांकडून सांगण्यात आले.  त्यांच्या या  प्रयत्नाला चांगले यश ही मिळाले. त्यास केंद्रातून गावातील ९० विध्यार्थी वेगवेगळ्या वर्गातून शिक्षण घेत असल्याचे चित्र सध्या याठिकाणी दिसून येत आहे. शाळेतील होणाऱ्या विविध स्पर्धांचा कमीपणा मुलांना वाटू नये म्हणूनच या तरुणाईने विविध  महापुरुषाची जयंती, पुण्यतिथीसह सामाजिक कार्य या सर्व बाबींवर उत्साहात कार्यक्रम पार पाडले. हे सर्व यशस्वी करण्यासाठी या तरुणाईला गावातील नोकरवर्ग  सर्व गावकरी, पालकवर्ग, युवक, पोलीस पाटील, तसेच ग्रामपंचायत प्रशासन सहाकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामज्ञान केंद्र सोन बुद्रूकचे कार्य बघून शहादा येथील सामाजिक संस्था विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष तात्या पवार यांनीही याठिकाणी भेट देत मदत करण्याची हमी दिली आहे. यावेळी त्यांच्याहस्ते केंद्रात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील  सामाजिक संघटना आदिवासी टायगर सेना धडगाव यांनी देखील मुलांना शैक्षणिक साहित्य या सर्व ९० विद्यार्थिनींना वाटप केली.ग्रामज्ञान केंद्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या तरुणाईने  कोणत्याही प्रकारची शिकवणी फी आकारली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.  गावातील शिक्षित युवकांनी केवळ सामाजिक जाणीव ठेवत हे केंद्र सुरु केल्याची माहिती युवकांकडून देण्यात आली.  विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन व तासिका देत त्यानुसार येथे कामकाज सुरु आहे. एक युवक एक विषयावर अभ्यास घेत विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेत असल्याची माहिती देण्यात आले आहे. गावातील युवकांनी केलेल्या उपक्रमाचे काैतूक होत असून दुर्गम भागातील इतर शिक्षित युवक या प्रकारचे उपक्रम गावोगावी सुरु करत असल्याची माहिती देण्यात आली  आहे. 

३० विद्यार्थ्यांचा एक गट तयारया विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी गावातील सुशिक्षित  १२ जणांचा ग्रुपदेखील आहे. या ग्रुपमधील तरुण वर्ग कोरोना महामारीच्या कठिण  काळात विद्यार्थ्यांना  शिकवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून प्रत्येक वर्गाचा अभ्यास क्रमानुसार वेळापत्रक तयार करून ३० विद्यार्थ्याचा गट तयार करून  तीन शिप्ट मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. ग्रामज्ञान केंद्रामध्ये शालेय शिक्षणासोबतच आदिवासी संस्कृतीचे धडेदेखील दिले जात होते. जेणेकरून येणाऱ्या पिढीने आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे हा उद्देश होता.