शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘वन रेशन-वन कार्ड’ योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्र शासनाची वन रेशन - वन कार्ड योजनेचा येथे शुभारंभ करण्यात आला असून, या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : केंद्र शासनाची वन रेशन - वन कार्ड योजनेचा येथे शुभारंभ करण्यात आला असून, या वेळी गुजरात हद्दीतील सद्गव्हाण येथील पाच लाभार्थ्ीना गहू, तांदूळ देण्यात आले. दरम्यान, या योजनेमुळे गुजरातमध्ये स्थलांतर करणा:या मजुरांनादेखील फायदा होणार असल्यामुळे योजनेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून गरीब व गरजू कुटुंबांना देशात कोठेही धान्य उपलब्ध करून देण्यासाठी ‘वनरेशन वनकार्ड’ ही योजना सुरू करण्याचा निर्णय या मंत्रालयाने घेतला होता. तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरा, महाराष्ट्र या राज्यात प्रायोगीक तत्वावर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारपासून या चारही राज्यात सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार योजनेचा शुभारंभ  तळोद्यापासून करण्यात आला.   या वेळी तळोदा शहरानजिक असलेल्या गुजरात हद्दीतील सद्गव्हाण येथील शांतीबाई ठाकरे, अमृत मोरे, आरती ठाकरे, आनंद मोरे, लिलूबाई ठाकरे, रमेश ठाकरे, अशा पाच लाभाथ्र्याना त्यांच्या रेशनकार्डवर रेशन दुकानातून प्रत्येकी 12 किलो गहू व पाच किलो तांदूळ देण्यात आले. या योजनेचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या हस्ते व जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी जिल्हा सूचना व माहिती अधिकारी धर्मेद्र  जैन, तहसीलदार पंकज लोखंडे, अव्वल कारकून संदीप परदेशी,             मयूर कानडे, संदीप रामोळे, भूषण रामोळे आदी उपस्थित होते. या योजनेचा लाभ येथून गुजरात राज्यात स्थलांतर करणा:या मजुरांनादेखील होणार आहे. कारण तळोदा तालुक्यातून दर वर्षी जवळपास तीन हजार मजूर ऊसतोडीसाठी गुजरातच्या कारखान्यात जात असतात. त्यामुळे त्यांना तेथे रेशन उपलब्ध होणार  आहे. याशिवाय काळाबाजारासदेखील आपोआपच चाप बसणार आहे.

योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रातून तळोद्यात तर गुजरातमधून सागबारा येथून करण्यात आला. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी लाभार्थ्ीना योजनेबाबत विचारपूस केली. केंद्राची ही योजना कशी आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी शासनाची ही योजना अत्यंत लाभदायक आहे. कारण स्थलांतर करणा:या मजूर वर्गास महाराष्ट्र व गुजरातमध्येही स्वस्त धान्याचा लाभ मिळेल. दरम्यान 2020 पासून देशातील पुन्हा 20 राज्याचा समावेश योजनेत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.