शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ई-ईपीक ओळखपत्राचा शुभारंभ मतदार दिवस ; विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असून, युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असून, युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे आणि मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले. यावेळी ई-ईपिक ओळखपत्र जिल्ह्यात वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला.तहसील कार्यालय नंदुरबार येथे आयोजित ११ व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार राहुल वाघ आदी उपस्थित होते. डॉ. भारूड म्हणाले, जिल्ह्यात दुर्गम भागात मतदान केंद्र असूनही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करीत मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याने सर्वांत चांगले काम केले. नागरिकांनी मतदानात   उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यास लोकशाही बळकट होईल, असे ते म्हणाले. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धांमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात ज्येष्ठ मतदार व नवमतदारांना ई-एपीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाचे, तसेच नूतन तहसील कार्यालयाच्या सभागृहाचे उद्घाटन करण्यात     आले. डॉ. भारूड यांनी यावेळी अभिलेख कक्षाची पाहणी केली. प्रास्ताविकात थोरात यांनी मतदार दिवस आयोजनाबाबत माहिती  दिली. दरम्यान, मतदार दिनानिमित्त इतरही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.