शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

८२ पथकांद्वारे राज्यातील सर्वात मोठे किलिंग ॲापरेशन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

सकाळी सर्व पथकातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करून टॉमी फ्लूच्या गोळ्या घेऊन कलिंग करण्यासाठी पोल्ट्रीतील शेड मध्ये पाठवण्यात आले. ...

सकाळी सर्व पथकातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करून टॉमी फ्लूच्या गोळ्या घेऊन कलिंग करण्यासाठी पोल्ट्रीतील शेड मध्ये पाठवण्यात आले. एक किलोमीटर परिसरातील दीड लाख कुकुट पक्षी दोन दिवसात नष्ट करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाचे आहे. त्याच्या एक किलोमीटर परिसरातील १० पोल्ट्री फार्म मधील पाच लाख पक्षी अगोदर नष्ट केले जाणार आहेत.पोल्ट्री व्यवसायिक यांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. तर यावर अवलंबून असलेल्या उद्योगातील हजारो तरुण बेरोजगार होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवापूर मधील चार पोल्ट्री मधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आले त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या किलिंग ऑपरेशन मध्ये काल दिवसभरात २०० पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ४० हजार कोंबड्या नष्ट केल्यात आज कर्मचारी संख्या वाढल्याने दुप्पट कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. अगोदर चार पोल्ट्री मधील दीड लाख पक्षी नष्ट केले जातील. त्यानंतर एक किलो मिटर परिसरात येणाऱ्या पोल्ट्री मधील ४ लाख ९० हजार पक्षी नष्ट केलं जाणार आणि उर्वरित पक्ष्यांसंदर्भात पाठविलेले अहवाल आल्या नंतर निर्णय घेण्यात येणार आहेत .पहिल्या टप्प्यात जवळपास ६ लाख कोंबड्या नष्ट केल्या जातील तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३ लाख कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दिली.

बर्ड फ्लूनंतर व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्या अनुषंगाने शासननिर्णयानुसार मिळणारी नुकसान भरपाई तोडकी आहे, असे मत व्यावसायिकांनी मत व्यक्त केले आहे.

कोंबड्यां सोबत अंडी आणि कोंबड्यांचे खाद्य नष्ट केले जात असल्याने होणारे नुकसान मोठे आहे. नवापूरमध्ये जवळपास करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूणच पोल्ट्री व्यवसाय नष्ट होण्याचा मार्गावर आहे.बर्ड फ्ल्यू मुळे पोल्ट्री व्यसायिकाना कोट्यवधी चा फटका बसला असला तरी पशुसंवर्धन विभागाची अनास्था कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

महसूल आयुक्तांची भेट व पाहणी

नवापुरातील बर्ड फ्लू झालेल्या पोल्ट्रीची दुसऱ्या दिवशी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन पाहणी केली व व्यावसायिक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. बर्ड फ्लू नियंत्रणासाठी योग्य कामगिरी करण्याचा सूचना केल्या.