शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

गुजरातमधील कामधंदा गेल्याने गावाकडच्या रोहयोचा मोठा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:08 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत येत्या वर्षात १२० कोटी रूपयांच्या कामांचे उद्दीष्ट्य जिल्हा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत येत्या वर्षात १२० कोटी रूपयांच्या कामांचे उद्दीष्ट्य जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. तत्पश्चात यंदाच्या वर्षात मात्र रोजगार हमी योजना स्थलांतरीतांच्या लाभाची ठरत असून लाॅकडाऊनमुळे कामधंदा सुटलेल्या गुजरात राज्यातील स्थलांतरीतांच्या हाताला काम मिळाले आहे.                जिल्ह्याच्या विविध भागातून गुजरात राज्यातील महानगरांमध्ये मिळेल ते काम करण्यासाठी मोठ्या संख्येने युवक जातात. काही जण याचठिकाणी स्थिरवतात तर काही जण वर्षातून दोन वेळा हंगामी म्हणून जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे या दोन्ही घटकांना तोटा झाला होता. वर्षानुवर्षे राहून सुरत, अहमदाबाद, बडोदा, वापी यासह विविध शहरात बस्तान बसवलेले काम बंद झाल्याने घरी परत आले होते. येथे मजूरी करुन उपजिविका भागवावी असे धोरण त्यांचे होते. परंतू अपयश आल्याने शेवट त्यांनी रोहयोच्या कामांमध्ये नाव नोंदणी करुन कामाला सुरूवात केली होती. यातून काम मिळत गेल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील विविध भागात सध्या हे मजूर रोहयोच्या कामांवर जात असल्याची माहिती समोर आले आहेत. 

वर्षात रोहयोची कामे वाढली गेल्या वर्षी ६७ कोटी रूपयांचे उद्दीष्ट्य रोजगार हमी योजनेत देण्यात आले होते. यांतर्गत रस्ताकाम, रोपवाटिकांची लागवड, मजगी, सीसीटी आदी कामे करण्यात आली होती. याकामांमुळे रोजगार निर्मिती झाली होती. याच कामांना पुढे नेत प्रशासनाने धडगावसह विविध तालुक्यात रोपवाटिका तयार करणे, रस्ते तयार करणे तसेच दुर्गम भागात विविध कामांना प्राधान्याने सुरूवात करण्यात आली आहे. 

९८६ रोहयोची कामे जिल्ह्यात सुरू आहेत

४६६७ रोह्योवर सध्या कार्यरत मजूर

१२०० मागील वर्षी नोव्हेंबरमधील कामे

गुजरात राज्यात कामाला होतो. लाॅकडाऊनमध्ये हातून काम गेले. म्हणून मग गावी परत आलो. याठिकाणी रोहयोंतर्गत मजूर म्हणून नोंदणी केली. जाॅबकार्ड तयार करुन कामांना सुरूवात केली आहे. १०० दिवस पूर्ण केले आहेत.  - काशिनाथ गुलाब ठाकरे, रांझणी ता. तळोदा

गुजरातमध्ये कामाला होतो. परत आल्यानंतर काय करावे हेच सुचत नव्हते. कुटूंबातील सदस्य आणि मित्रपरीवाराने मदत करुन रोहयोमध्ये नोंदणी करुन दिली. यातून रोजगार मिळाला आहे. मिळणा-या रोजगारातून कुटूंबाचे पालनपोषण होत आहे.  -कालूसिंग मंगा वळवी, रांझणी ता. तळोदा