शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

के.सी. पाडवी यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 11:04 IST

कायद्याची लढाई लढणार : वनगावांबाबत सरकार गंभीर नाही

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील 73 वनगावांसंदर्भात आमदार अॅड.के.सी. पाडवी यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेले लाक्षणिक उपोषण शुक्रवारी स्थगित केले आहे. यासंदर्भात कायद्याची लढाई लढण्यासाठी व वनगावातील सुमारे एक लाख लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केंद्र सरकारच्या पातळीवर अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.धडगाव तालुक्यातील 73 वनगावे अद्याप महसुली झाले नाहीत. यासंदर्भात आमदार अॅड.के.सी. पाडवी यांनी यापूर्वी 1992 मध्ये दिल्लीत आंदोलन केले होते. त्यासंदर्भात शासनाने गॅङोट काढले पण पुन्हा त्याला स्थगिती मिळाली. त्यामुळे अद्याप वनगावे महसुली झाले नाहीत. दरम्यानच्या काळात नवीन कायदे, न्यायालयातील दावे यामुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा ठरला. या पाश्र्वभूमीवर आमदार अॅड.के.सी. पाडवी यांनी या विषयावर लक्ष केंद्रीत करीत धडगाव तहसील कार्यालयावर महामोर्चा काढून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली होती. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू होते. या उपोषण काळात प्रांताधिका:यांनी भेट देऊन त्याबाबतचे आश्वासनही दिले होते. मात्र उपोषण सुरूच होते. शुक्रवारी पत्रकारांना साक्षी ठेवत आपली भूमिका जाहीर करून त्यांनी आंदोलन स्थगित केले. या वेळी त्यांनी सांगितले की, धडगाव तालुक्यातील निम्मे गावे ब्रिटिश शासनाने 1926 मध्येच महसुली केले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतात 1977 ला कायदा झाल्यानंतर देशातील 448 वनगावे महसुली झाले. मात्र धडगाव तालुक्यातील 73 गावे तशीच राहिली. त्यासंदर्भात आंदोलन केल्यानंतर शासनाने गॅङोट काढले. पण त्यातही सात अटी-शर्ती टाकल्या. त्या आदेशाला पुढे स्थगितीही दिली. याविषयी आपली भूमिका स्पष्ट आहे की, 1977 च्या कायद्यानंतर येथील गावे महसुली करण्यासाठी सव्रेक्षण झाले. त्यातील जरली या पहिल्या गावाचे सव्रेक्षण 5 फेब्रुवारी 1979 ला झाले. दोन वर्षात सव्रेक्षण झाल्यानंतर सर्व गावांचे नकाशे, सातबारा उतारा, भूमीअभिलेख कार्यालयाने तयार करून धडगाव तहसील कार्यालयाला दिले आहे. ते कागदपत्रे जशीच्या तशी स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी व ते लोकांना द्यावे, अशी आपली मागणी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आपण हे आंदोलन केले. हा विषय खरे तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. परंतु त्याचे कागदपत्र धडगाव तहसीलला असल्याने लोकांच्या जनजागृतीसाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी स्थानिक पातळीवर हे आंदोलन आपण केले. यापुढे केंद्र शासनाच्या दरबारी कायद्याची लढाई लढून लोकांना न्याय मिळवून देऊ. त्यासाठी पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.  या वेळी वनगावातील रहिवासी तसेच आमदार अॅड.पाडवी समर्थक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.