शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

करणपाडा जिल्हा परिषद शाळा इमारतीला तडे गेल्याने धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील वर्ग खोल्यांच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील वर्ग खोल्यांच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने ह्या वर्ग खोल्या धोकेदायक झाल्या असून, सध्या पावसाळा सुरू असल्याने याठिकाणी पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थी ओले होऊ नये म्हणून वर्गात प्लास्टिकचा पाल बांधून विद्याथ्र्याना शिक्षण देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. याबाबत गेल्या चार ते पाच वर्षापासून जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिका:यांना निवेदन देवूनदेखील कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबधित प्रशासन याठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यावर लक्ष देईल की? काय अशा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून, याठिकाणी दोन वर्ग खोल्या आहे. यातील एका वर्गखोलीच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने छतावरील काही भागदेखील सरकला असल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरून भिंती कोणत्याक्षणी कोसळून अपघात घडू शकतो अशी परिस्थिती आहे. या वर्ग खोलीला लागून असलेल्या दुस:या वर्ग खोलीत या दोन्ही खोलीतील विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथी र्पयतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. दरम्यान वर्ग खोलीत पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थी ओले होवू नये म्हणून वर्गखोलीत प्लास्टिकचे पाल बांधून विद्याथ्र्याना शिक्षण दिले जात आहे.  या पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्याच्या वर्ग खोलीला लागूनच जवळील वर्ग खोलीच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने धोकेदायक स्थितीनिर्माण झाली असल्याचे करणपाडा येथील  जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास ईश्वर तडवी, उपाध्यक्ष अरविंद दशरथ पाडवी, सदस्य दिनेश वाडग्या पाडवी, गणेश जयसिंग पाडवी, गौविद्रीबाई शंकर वळवी, तुलसीबाई चोमा पाडवी, लताबाई उदेसिग तडवी, सुनिताबाई फुलसिग वळवी, ललिताबाई राजकुमार वळवी, लताबाई अशोक तडवी यांनी सांगितले.

करणपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून, ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा धोका अधीच वाढला आहे. शाळेचे छप्परदेखील गळके असल्याने पावसाच्या पाण्यापासून संरक्षणासाठी प्लास्टीकचे कागद टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. या इमारतीच्या दुरूस्तीबाबत व संभाव्य धोक्याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे.